Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाNeeraj Chopra : नीरज चोप्राचा डबल धमाका, वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलसह पटकावलं ऑलिम्पिकचं...

Neeraj Chopra : नीरज चोप्राचा डबल धमाका, वर्ल्ड चॅम्पियनशिप फायनलसह पटकावलं ऑलिम्पिकचं तिकिट

दिल्ली | Delhi

भारताचा स्टार भालाफेकपटू नीरज चोप्राने पुन्हा एकदा शानदार कामगिरी केली आहे. हंगेरीची राजधानी बुडापोस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२३ मध्ये आजचा दिवस भारतासाठी खास आहे. भारताला आजपर्यंत या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकता आले नाही. २००३ साली लांब उडीमंध्ये अंजू बॉबी जॉर्जने कांस्य पदक जिंकले होते तर गेल्यावेळी नीरजने रौप्य पदक जिंकले होते. आता यावेळी नीरजचे लक्ष्य सुवर्ण पदकावर असून पात्रता फेरीत त्याने सुवर्ण पदकाच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे.

- Advertisement -

पात्रता फेरीत नीरजने पहिल्याच प्रयत्नात ८८.७७ मीटरचा थ्रो केला आणि अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. नीरजने दुसऱ्या प्रयत्नात ८१.३१ मीटर इतका लांब थ्रो केला. अंतिम फेरीसाठी ऑटोमेटिक क्वॉलिफिकेशन मार्क ८३ मीटर असल्याने नीरजने पहिल्याच प्रयत्नात अंतिम फेरी गाठली. पहिल्या प्रयत्नात ८८.७७ मीटर लांब भाला फेकून नीरज गुणतक्त्यात अव्वल स्थानी राहिला. या हंगामातील ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. वर्ल्ड एथलेटिक्स चॅम्पियशिपमध्ये तो सुवर्ण पदकाचा दावेदार मानला जात आहे. नीरजने फक्त अंतिम फेरीत धडक मारली नाही तर तो २०२४ मध्ये होणाऱ्या पॅरिस ऑलिपिकसाठी देखील पात्र ठरला आहे.

नीरज चोप्राची ही या मोसमातील सर्वोत्तम धावसंख्या आहे. दुखापतीतून परतल्यापासून तो लॉसने डायमंड लीगमध्ये फॉर्ममध्ये नव्हता, परंतु या स्पर्धेत त्याने पहिल्या थ्रोवर खूप अंतर गाठण्यात यश मिळविले. एकाच थ्रोच्या जोरावर त्याने चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत आणि ऑलिम्पिकपर्यंत मजल मारली आहे. आतापर्यंत या स्पर्धेत भारताला एकदाही सुवर्णपदक जिंकता आलेले नाही. गेल्या वेळी नीरजने या स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते. यावेळी जर त्याने सुवर्णपदक जिंकले तर तो आणखी एक इतिहास घडवेल. अ‍ॅथलेटिक्समधील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या पात्रता फेरीत एकूण २७ खेळाडूंनी सहभाग घेतला. यापैकी १२ खेळाडूंनी अंतिम फेरी गाठली. नीरज चोप्रा हा फायनलमध्ये आपले स्थान निश्चित करणारा पहिला अ‍ॅथलीट होता.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या