Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडा‘गोल्डन बॉय’ Neeraj Chopra ने इतिहास रचला! पाकिस्तानच्या नदीमला हरवत ‘सुवर्ण’ कमाई

‘गोल्डन बॉय’ Neeraj Chopra ने इतिहास रचला! पाकिस्तानच्या नदीमला हरवत ‘सुवर्ण’ कमाई

दिल्ली | Delhi

बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत रविवारी (27 ऑगस्ट) भारतासाठी सोन्याचा दिवस उगवला. भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने सुवर्णपदक जिंकून या स्पर्धेच्या इतिहासात सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला. त्याने पाकिस्तानच्या अर्शद नदीम याला पराभूत केले.

- Advertisement -

पाकिस्तानच्या अर्शद नदीमचं नीरज चोप्राला मोठं आव्हान होतं. अर्शदची आत्तापर्यंतची सर्वोत्तम भालाफेक ९० मीटरहून जास्त होती. त्यामुळे नीरजला नदीम कडवी टक्कर देणार असं चित्र दिसत होतं. झालंही तसंच. अर्शदनं पहिल्या फेरीत ७४.८० मीटर तर दुसऱ्या फेरीत थेट ८२.१८ मीटर टप्प्यापर्यंत भालाफेक केली. तिसऱ्या फेरीत तर त्यानं थेट ८७.८२ मीटरपर्यंत भालाफेक केल्यामुळे नीरजला त्याच्याही पुढे भालाफेक करण्याचं आव्हान होतं. मात्र, नदीमला लीलया मागे टाकत नीरजनं सुवर्णपदक मिळवलं!

या अगोदर नीरजने (Neeraj Chopra) डायमंड लीगमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. तर 2020 साली त्याने ऑलिम्पिक स्पर्धेत भालापेक याच प्रकारात पहिल्यांदा सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी ऑलिम्पिक स्पर्धेत भारताची ती ऐतिहासिक कामगिरी ठरली होती. तर आता पुन्हा त्याने हंगेरीतील बुडापेस्ट येथे सुरू असलेल्या जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships) स्पर्धेत पुन्हा एकदा ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या