Tuesday, November 26, 2024
Homeक्रीडाNeeraj Chopra : "मी स्वत:ला..."; सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

Neeraj Chopra : “मी स्वत:ला…”; सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राची पहिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली | New Delhi

हंगेरीची राजधानी बुडापेस्ट (Budapest) येथे सुरू असलेल्या वर्ल्ड ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप (World Athletics Championships) स्पर्धेत रविवार (दि.२७) रोजी भारताचा ऑलिम्पिक सुवर्णपदक (Gold Medal) विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा याने अंतिम सामन्यात पाकिस्तानच्या अर्शद नदीम याला पराभूत करत सुवर्णपदक जिंकून या स्पर्धेच्या इतिहासात सुवर्ण जिंकणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला आहे…

- Advertisement -

‘गोल्डन बॉय’ Neeraj Chopra ने इतिहास रचला! पाकिस्तानच्या नदीमला हरवत ‘सुवर्ण’ कमाई

या यशानंतर नीरज चोप्राच्या (Neeraj Chopra) कुटुंबियांसह देशभरात जल्लोष करण्यात येत आहे. तसेच सुवर्णपदक जिंकल्यानंतर नीरज चोप्राने पहिली प्रतिक्रिया दिली असून देशवासियांचे आभार मानत एक खास संदेश दिला आहे. नीरज चोप्राने म्हटले आहे की, मी स्वत:ला पूश केले, स्पीडमध्ये माझे १०० टक्के देत होतो तसं नसतं झालं तर त्याची उणीव जाणवली असती. मी सर्व देशवासियांचे आभार मानतो की तुम्ही सगळे रात्रभर जागे राहिलात आणि मला सपोर्ट केला. सर्वांनी वेगवेगळ्या क्षेत्रात मेहनत करा आणि संपूर्ण जगात आपल्या देशाचे नाव करा, असं नीरज चोप्रा म्हणाला.

Sanjay Raut : ‘इंडिया आघाडी’चा लोगो कसा असणार? संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

तसेच नीरज चोप्राचा हा सामना (Match) पाहण्यासाठी त्याच्या घरी गावकऱ्यांनी गर्दी झाली होती. नीरजने तो ऐतिहासिक भाला फेकल्यानंतर (Javelin Throw) कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी एकच जल्लोष केला. त्यांचा जल्लोषाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तर नीरजचे चुलते भीम चोप्रा यांनी “ज्याच्या पाठीमागे १४० कोटी भारतीयांचे आशिर्वाद आहेत तो कधीच हरू शकणार नाही.” असे म्हटले आहे.

असं जिंकल नीरज चोप्राने सुवर्णपदक

नीरज चोप्रा आणि पाकिस्तानचा (Pakistan) अर्शद नदीम (Arshad Nadeem) हे भालाफेकच्या अंतिम सामन्यात होते. जेव्हा नीरजने पहिला भाला टाकला त्यावेळी तो फाऊल गेला. त्यानंतर पुन्हा दुसऱ्यांदा नीरजने ८८.१७ मीटरचा भाला फेकला. त्यामुळे अंतिम सामन्यात त्याच्या पुढे कोणालाही जाता आले नाही. अर्शदने ८७.८२ मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. त्यामध्ये त्याला रौप्यपदक मिळाले. तर जैकोब वाडले हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला. त्याने ८६. ६७ मीटर अंतरापर्यंत भाला फेकला. त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

India Alliance : ‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण? मुंबईतील बैठकीआधी कॉंग्रेसच्या ‘या’ नेत्याने दिली महत्त्वाची माहिती

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या