Thursday, June 20, 2024
Homeक्रीडानीतू घंघास बनली वर्ल्ड चॅम्पियन; जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

नीतू घंघास बनली वर्ल्ड चॅम्पियन; जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक

नवी दिल्ली | New Delhi

- Advertisement -

जागतिक महिला बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये (World Women’s Boxing Championship) नीतू घंघासने (Neetu Ghanghas) ४८ किलो वजनी गटात मंगोलियन बॉक्सर लुत्साईखानला (Lutsaikhan) हरवून सुवर्णपदकावर (gold medal) आपले नाव कोरले आहे. तिच्या या विजयामुळे खेळ क्षेत्रात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

तीने ही विजयाची माळ खेचून आणताना, मंगोलियाच्या लुत्साईखानचा ५-० असा पराभव केला आहे. दरम्यान, हा सामना अतिशय रोमांचक झाला. फायनल सामन्यात नीतू सुरुवातीपासूनच वर्चस्व गाजवताना दिसली. पहिली फेरी ५-० ने जिंकल्यानंतर नीतूने लुत्साईखानला दुसऱ्या फेरीत पुनरागमन करण्याची संधी दिली नाही. विरोधी बॉक्सरने शर्तीचे प्रयत्न केले, पण नीतूने आपला दबदबा कायम राखला. दुसरी फेरी नीतूने ३-२ अशी जिंकली.

अर्धवेळ ग्रंथपालांची पूर्णवेळ नियुक्ती करण्याबाबत वित्त विभागास प्रस्ताव

यानंतर, तिसर्‍या फेरीत तिने पायाची चांगली हालचाल दाखवली आणि लुत्साईखानच्या आक्रमक खेळीतून स्वतःचा बचाव केला. अशाप्रकारे तिसरी फेरी जिंकून नीतूने विजेतेपद पटकावले. नीतूचे हे पहिले विश्वविजेतेपद आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

दोन्ही खेळाडूंनी अतिशय चांगली लढत दिल्यामुळे, प्रेक्षकांना शेवटपर्यंत विजेत्याचा अंदाज लावणे कठीण जात होते. मोठ्या ताकदीच्या खेळानंतर अखेरीस भारताची नीतूला विजयी घोषित करण्यात आले. या विजयानंतर नीतू घंघास वर्ल्ड चॅम्पियन बनणारी सहावी भारतीय बॉक्सर (World Champion Boxer) (पुरुष किंवा महिला) ठरली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या