Wednesday, January 7, 2026
HomeनगरAMC : नेहरू मार्केट प्रश्नी आयुक्तांच्या भूमिकेला गाळेधारकांचा विरोध

AMC : नेहरू मार्केट प्रश्नी आयुक्तांच्या भूमिकेला गाळेधारकांचा विरोध

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अनेक वर्षांपासून रखडलेल्या नेहरू मार्केट संकुलाच्या नव्या उभारणीला महानगरपालिकेने गती दिली आहे. चार मजली संकुलात तळ मजल्यावर 70 ओटे व एकूण 61 व्यावसायिक गाळे उपलब्ध होणार आहेत. जुन्या गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याची महापालिकेची योजना असली तरी तळघरात व इतर वरच्या मजल्यावर गाळे देण्याला नेहरू मार्केट गाळेधारक युनियनने तीव्र विरोध दर्शविला आहे. युनियनचे अध्यक्ष संजय झिंजे यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे आयुक्तांच्या भूमिकेवर कठोर आक्षेप नोंदवला आहे.

- Advertisement -

युनियनचे म्हणणे आहे की, सर्व 70 ओटे आणि 14 मूळ गाळे हे फक्त ग्राऊंड फ्लोअरला देण्यात यावेत. कारण, आम्ही सर्वजण पूर्वीपासून ग्राउंड फ्लोअरवरच व्यवसाय करत आलो आहोत. त्यामुळे आमचा ऐतिहासिक हक्क अबाधित ठेवला पाहिजे, असे झिंजे यांनी स्पष्ट केले. महापालिकेने तळमजल्यावरील काही गाळे वरच्या मजल्यावर देण्याची शक्यता व्यक्त केल्याचा तीव्र निषेध करण्यात आला. वरच्या मजल्यावर कुठेही भाजी बाजाराचे गाळे नसतात, मग आम्ही व्यवसाय कसा करणार? असा सवाल युनियनने उपस्थित केला. झिंजे म्हणाले की, महापालिकेने भाजी विक्रेत्यांना कोणतेही पुनर्वसन निश्चित न करता सध्या जागा रिकामी करून घेतली.

YouTube video player

पत्रे ठोकून त्यांना रस्त्यावर आणले. त्यांच्या उपजीविकेवर गदा आली. हे आयुक्तांचे बेकायदेशीर कृत्य आहे, असा आरोप झिंजे यांनी केला आहे. युनियनने स्पष्ट केले की, प्रकल्पात दाखवलेल्या 61 गाळ्यांशी 14 मूळ गाळ्यांचा काहीही संबंध नाही. हे 14 गाळे हे मुळ भाजी विक्रेत्यांचे असून, महापालिकेने त्यांना गाळे देण्याबाबत हायकोर्टात हमीपत्र दिले आहे. त्यामुळे हे गाळे त्यांना कन्स्ट्रक्शन कॉस्ट या दरातच दिले पाहिजे. हा आमचा कायदेशीर हक्क असून मागणी अजिबात गैर नाही, असे झिंजे यांनी नमूद केले.

ताज्या बातम्या

Prakash Londhe : रडायचं नाही लढायचं! तासाभरासाठी जेलमधून आलेल्या लोंढेंचा कुटुंबीयांना...

0
नाशिक | Nashik सातपूर (Satpur) येथील ऑरा बार प्रकरणासह खंडणीच्या विविध गुन्ह्यांमध्ये मोक्काच्या कारवाईमधील अटकेत असलेले आरपीआय जिल्हाध्यक्ष प्रकाश लोंढे (Prakash Londhe) यांना काल (मंगळवारी)...