नेपाळमधील हिंसक निदर्शनांनंतर, देशाला एका मोठ्या राजकीय संकटाचा सामना करावा लागला. केपी शर्मा ओली यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्र्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला. दरम्यान, नेपाळमधील परिस्थिती सतत बदलत आहे. नेपाळची संसद विसर्जित करून पुढील राष्ट्रीय निवडणुका होईपर्यंत अंतरिम सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे . राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी सुशीला कार्की यांची नेपाळच्या पहिल्या महिला कार्यवाहक प्रमुख म्हणून नियुक्ती केली.सुशीला कार्की नेपाळच्या अंतरिम सरकारच्या प्रमुख असतील.
नेपाळमधील Gen-z निदर्शकांनी माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांच्या नावावर एकमत केले होते. दरम्यान .सुशीला कार्की यांनी आज रात्री ९:३५ वाजता नेपाळच्या अंतरिम सरकारच्या प्रमुख पदाची शपथ घेतली . सुशीला कार्की यापूर्वी नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश होत्या.
नेपाळमधील जनरल झेड चळवळीच्या मागण्यांवर अंतरिम सरकार स्थापन करण्याचे प्रयत्न सुरू होते. परंतु जर एकमत झाले नाही तर आणीबाणी लागू करण्याची तयारीही सुरू होती. दरम्यान, नवीन सरकार स्थापन न झाल्यास लष्कराने आणीबाणी लागू करण्याचा प्रस्ताव मांडला होता असे समजते




