नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राजधानी दिल्लीमध्ये पुन्हा एकदा स्फोट सदृश्य घटना घडल्याचे वृत्त समोर आले आहे. महिपालपूरमध्ये रेडियन्स हॉटेलजवळ ही घटना घडल्याचे समोर आले. ९ वाजण्याच्या आसपास या परिसरातून अग्निशामन दलाला फोन आल्याची माहिती मिळाली आहे. स्फोट कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे म्हटले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेडियन्स हॉटेलजवळ स्फोटासारखा आवाज झाल्याचे स्थानिकांनी सांगितेलय. तीन दिवसांपूर्वी राजधानी दिल्लीमधील लाल किल्ल्याजवळ कारमध्ये ब्लास्ट झाल्याची घटना ताजी असतानाच आणकी एका स्फोटाच्या आवाजाने दिल्ली हादरली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळले नसल्याचे म्हटले आहे. सध्या, तीन अग्निशमन दल घटनास्थळी उपस्थित आहेत. सध्या, दिल्ली पोलिसांनी परिसराची पडताळणी केली आहे आणि काहीही संशयास्पद आढळले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
दिल्लीतील महिपालपूर येथील रेडिसन हॉटेलजवळ स्फोटाचा आवाज ऐकू आला. गुरुवारी (१३ नोव्हेंबर) सकाळी ९:१८ वाजता अग्निशमन विभागाला फोन करण्यात आला. स्फोटाचे कारण तपासात उघड झाले आहे. दिल्ली पोलिसांनी सांगितले की डीटीसी बसमध्ये टायर फुटल्याने हा आवाज आला. घटनास्थळी काहीही संशयास्पद आढळले नाही.
परिसरातील लोकांमध्ये पॅनिकची कोणतीही परिस्थिती नाही. दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ सोमवारी संध्याकाळी आय २० कारमध्ये स्फोट झाला होता. यामध्ये १३ जणांचा मृत्यू झाला. या स्फोटाच्या घटनेनंतर दिल्लीसह देशातील अनेक शहरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





