Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्याराज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारणार

राज्यात नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारणार

मुंबई । प्रतिनिधी Mumbai

राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये नव्याने वैद्यकीय महाविद्यालये ( New Medical Colleges ) स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन (Medical Education Minister Girish Mahajan) यांनी केली आहे.

- Advertisement -

दरम्यान, यामध्ये 12 पैकी 6 जिल्हे हे विदर्भातील असून बाकी 6 उर्वरित विभागातील आहेत. त्यामुळे नव्या वैद्यकीय महाविद्यालयांची घोषणा करताना वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीश महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भातील गडचिरोली, वाशिम, बुलडाणा, भंडारा, अमरावती आणि वर्धा या 6 जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय महाविद्यालयांची उभारणी केली जाणार आहे. त्यानंतर मराठवाड्यातील हिंगोली आणि जालनामधे नवे वैद्यकीय महाविद्यालय उभे राहील.

- Advertisment -

ताज्या बातम्या