Saturday, July 27, 2024
Homeनाशिककळवणसाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर

कळवणसाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर

कळवण । प्रतिनिधी Kalwan

कळवण शहराची ( Kalwan City ) आगामी 25 ते 30 वर्षात वाढती लोकसंंंख्या गृहीत धरून शहरांसाठी पिण्याच्या पाणी पुरवठ्यासाठी 25 कोटी रूपये खर्चाची नवीन योजना मंजूर (New water supply scheme approved ) झाली आहे.

- Advertisement -

आमदार नितीन पवार( MLA Nitin Pawar ) , गटनेते कौतिक पगार यांनी पाठपुरावा करून महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेतंर्गत 25 कोटीच्या निधीस प्रशासकीय मान्यता मिळवली आहे. हीं योजना लवकरच कार्यान्वीत होऊन शहराचा पाणीपुरवठा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) , उपमुख्यमंत्री अजित पवार ( Deputy Chief Minister Ajit Pawar ) व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कळवण नगर पंचायतच्या पाणी पुरवठा योजनेस नुकतीच प्रशासकीय मान्यता दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यतेचे पत्र सुपूर्द केले आहे. चणकापूर धरणातून ही योजना राबविण्यात येणार आहे.

19 किमी लांंबीची जलवाहिनी गुरुत्वाकर्षणावर प्रवाहित होणार आहे.शासनाने, तांंत्रिकदृष्ट्या योजनेचा अभ्यास करून प्रशासकीय मान्यता दिली. शहरात पाणीपुरवठा योजना सौर ऊर्जेवर कार्यान्वित होणार आहे. वीजेची पूर्ण बचत होणार आहे, दरमहा असलेला लाईट बिलाचा भार कमी होणार असल्यामुळे सौर ऊर्जेवर कार्यान्वित होणारी ही पथदर्शी पहिली पाणीपुरवठा योजना जिल्ह्यात ठरणार आहे.

कळवण शहरासाठी पूर्वी 0.86 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित होते आता त्यात 1.39 दशलक्ष घनमीटर आरक्षण वाढविण्यात आले. सध्या अस्तित्वात असलेली पाणी पुरवठा योजना हीं 40 लिटर प्रतिव्यक्ती असून नवीन पाणी पुरवठा योजना 130 लिटर प्रति व्यक्तीने मंजूर झालेली आहे. पूर्वीचे जंलकुंभ हे 5.25 लाख लिटर क्षमतेचे असून नवीन योजनेत 17.65 लाख लिटर क्षमतेचे शिवाजीनगर, गणेशनगर, संभाजीनगर येथे 3 नव्या जलकुंभ होणार आहे.

जुने जलशुद्धीकरण केंद्राबरोबर या योजनेत संभाजीनगर मध्ये नवीन जलशुद्धीकरण केंद्र मंजूर करण्यात आल्यामुळे कळवणकर जनतेला शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येणार आहे. सध्या अस्तित्वातील योजना 20 किमी लांबीची असून नवीन योजना 17 प्रभागात पाणी पुरवठा करणार असून तिची लांबी 38 किमी असणार आहे.

कळवण शहराच्या वाढत्या विस्तारामुळे उपलब्ध योजनेतून कळवण शहराला पाणी पुरवठा होणार असल्याने टंचाई दूर होणार आहे. 25-30 वर्षाची लोकसंख्या गृहीत धरुन नवीन योजना 25 कोटी खर्चून लवकरच कार्यान्वित होईल.

– आ. नितीन पवार, कळवण MLA Nitin Pawar

कळवण शहराला पाणी पुरवठा करणार्‍या गिरणा नदीपात्रातील योजनेचे उदभव उन्हाळ्यात कोरडेठाक पडतात. त्यामुळे चणकापूर प्रकल्प स्थळावरून पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव शासनस्तरावर दाखल होता. शासनाने योजनेला प्रशासकीय मान्यता दिली आहे.

– कौतिक पगार, गटनेते कळवण नगरपंचायत Kautik Pawar- Kalwan Town council

- Advertisment -

ताज्या बातम्या