Sunday, April 27, 2025
Homeनगरनेवासा तालुक्यातील 17 गावांत 40 संक्रमित

नेवासा तालुक्यातील 17 गावांत 40 संक्रमित

नेवासा |का. प्रतिनिधी| Newasa

नेवासा तालुक्यातील 17 गावांतून काल दुपारपर्यंत 40 जणांच्या चाचण्या करोना संक्रमित आढळून आल्या असून

- Advertisement -

त्यामुळे तालुक्यातील एकूण करोना संक्रमितांची संख्या 1940 झाली आहे.

नेवासा तालुक्यातील जेऊर हैबती येथे काल सर्वाधिक 8 करोना संक्रमित आढळून आले. लोहगाव येथे 5 तर जळके खुर्द येथे 4 संक्रमित आढळले.

भेंडा खुर्द, सोनई व झापवाडी या तीन गावांतून प्रत्येकी तिघे संक्रमित आढळले. कुकाणा, नेवासा खुर्द व शिंगणापूर या तीन गावांतून प्रत्येकी दोघांना करोना बाधा झाल्याचे दिसून आले.

भानसहिवरा, भेंडा बुद्रुक, चांदा, देडगाव, फत्तेपूर, गणेशवाडी, शिंगवेतुकाई व तेलकुडगाव या 8 गावांतून प्रत्येकी एकाला करोना संक्रमण झाले.

अशाप्रकारे तालुक्यातील 17 गावांतून 40 संक्रमित आढळल्याने तालुक्यातील करोना संक्रमितांची एकूण संख्या 1940 वर गेली आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Ladki Bahin Yojana : “लाडक्या बहि‍णींना २१०० रुपये देऊ…”; मंत्री...

0
मुंबई | Mumbai लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) महायुतीला (Mahayuti) बसलेल्या झटक्यानंतर राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्य सरकारने लागू केली. या...