Saturday, September 21, 2024
Homeनगरएकास बेडी घालून मारहाण; उलट सुलट चर्चेला उधाण

एकास बेडी घालून मारहाण; उलट सुलट चर्चेला उधाण

गणेशवाडी | वार्ताहर

- Advertisement -

नेवासा तालुक्यातील गणेशवाडी येथे रविवारी रात्री एका वस्तीवर एकाच्या डोक्यात पिशवी व हातात बेडी घालून मारहाण केल्याची घटना घडली असून यामुळे परिसरात घबराट पसरली आहे.

याबाबत माहिती अशी की, गणेशवाडी येथील किशोर नारायण डौले यांचे वस्तीवर चोरांनी चक्क महाराष्ट्र पोलीस बेड्याचा वापर करत किशोर डौले या व्यक्तीला हातात बेडी घालून डोक्यात पिशवी घालत मारहाण केली. विशेष म्हणजे चोरीचा उद्देश म्हणावा तर डौले यांच्या पत्नीच्या अंगावरील दागिने व किशोर यांचे अंगावरील दागिन्यांना मारेकऱ्यांनी हात सुध्दा लावला नाही.

MBBS ची विद्यार्थिनी सदिच्छा साने बेपत्ता प्रकरणाचं गूढ उकललं! जीवरक्षकानंच घेतला जीव

या सर्व झटापटी मध्ये आरडाओरडा झाल्याने मारेकरी बेडी व तिची चावी तेथेच सोडून पळून गेले. या घटनेने उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे. चावी सकट बेडी म्हणजे हे चोर समजावे की आणखी कोणी? त्यांच्याकडे बेडी आली कुठून? त्यांचा उद्देश चोरी करण्याचा होता की मारहणीचा ? असा प्रश्न भेडसावत आहे.

बस दरीत कोसळून भीषण अपघात; ५ जणांचा मृत्यू, आकडा वाढण्याची भीती
कडाक्याची थंडी…आसपास कोणीही नाही अन् तिला प्रसूती वेदना सुरू झाल्या…मग… शेतात पाणी द्यायला गेले अन् समोर दिसले बिबट्याचे बछडे; पुढे असं घडलं की…

- Advertisment -

ताज्या बातम्या