Friday, May 3, 2024
Homeनगरचोरट्यांच्या हल्ल्यात युवक जखमी

चोरट्यांच्या हल्ल्यात युवक जखमी

सोनई | वार्ताहर

नेवासा तालुक्यातील सोनई येथे मंगळवारी रात्री महावीर पेठेतील घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी एका युवकास गंभीर जखमी केले आहे. या घटनेनंतर गाव व परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

- Advertisement -

उद्योजक विजय चांडक याच्या घराचा दरवाजा तोडून चोरटे घरात घुसणार एवढ्यात विजय चांडक यांचा मुलगा कृष्णा यास जाग आली. तो दरवाजा जवळ येताच चोरटे घराबाहेर पडले. एका चोरट्याचा हात धरला असता अन्य चोरट्यांनी कृष्णाच्या तोंडावर दगड फेकून मारला. यामध्ये त्याचे चार दात तूटून आठ टाके पडले आहे. दोन्ही पायासही जखमा आहेत.

दारू दुकान फोडले; दारूसह सीसीटीव्ही केला लंपास

चांडक यास मारहाण होत असताना आवाज ऐकून माजी पंचायत समितीचे सदस्य राजेंद्र गुगळे घराबाहेर आले. त्यांनी प्रसंगावधान ओळखून आपल्या परवानगी असलेल्या बंदुकीतून हवेत गोळीबार केला आणि सर्व चोरटे पळून गेले. यानंतर जवळचे ग्रामस्थ जमा झाले. पोलिसांचा ताफाही आला. शोध घेवूनही चोरटे हाताला लागले नाही.

मागील पाच-सहा दिवसापासून सोनई गाव व जवळच्या काॅलणीत चोरट्यांच्या धुमाकूळ सुरु आहे. गावातील अनेकांच्या सीसीटीव्ही फुटेज मध्ये चोरटे दिसले आहे. गावातील प्रत्येक चौकात लावण्यात आलेली सीसीटीव्ही यंत्रणा बंद पडली असल्याने ग्रामस्थांत अधिकच भितीचे वातावरण पसरले आहे. रोजच आले..आले..पळाले..पळाले.. च्या आवाजाने ग्रामस्थांच्या झोपा उडाल्या आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या