Saturday, May 4, 2024
Homeनगरदामदुप्पटीच्या आमिषाने नेवाशातील शेतकर्‍याला लावला तब्बल एक कोटी 79 लाखाला चुना

दामदुप्पटीच्या आमिषाने नेवाशातील शेतकर्‍याला लावला तब्बल एक कोटी 79 लाखाला चुना

नेवासा |का.प्रतिनिधी| Newasa

‘दुनिया झुकती है, झुकानेवाला चाहिये’ या म्हणीचा प्रत्यय नेवासा तालुक्यातील भानसहिवरा येथील प्रसाद नंदकिशोर भणगे या शेतकर्‍याला आला. दोन वर्षात दामदुप्पट पैसे करून घेण्याच्या लोभापायी त्यांना पारनेर तालुक्यातील सहा ठगांनी सुमारे एक कोटी एकोणअंशी लाख रुपयांना चुना लावला.

- Advertisement -

दरम्यान, फसवणूक करणार्‍या त्या सहा ठगांना नेवासा पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत. या घटनेमुळे नेवासा तालुक्यासह नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

ही घटना ऑक्टोबर 2018 ते फेब्रुवारी 2020 रोजी नेवासा फाटा व अहमदनगर येथे घडली. याप्रकरणी नेवासा पोलीस ठाण्यात वैभव अनंत चेमटे, अनंत दत्तात्रय चेमटे, भुषण अनंत चेमटे (सर्व रा.भाळवणी ता. पारनेर जि. अहमदनगर) तसेच बाळासाहेब दगडू सालके, भाऊसाहेब सदाशिव सालके (दोघे रा.काळकूप ता.पारनेर जि.अहमदनगर), निलेश भाऊसाहेब शिंदे (रा.टाकळी ढोकेश्वर ता. पारनेर जि.अहमदनगर) या सहा जणांवर गु. र. नं. व कलम 144/22 भादंवि. कलम 406, 420 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी प्रसाद नंदकिशोर भणगे (वय 26 वर्षे, रा.भानसहिवरा मारुती तळे, ता.नेवासा) यांचा वरील सहा जणांनी विश्वास संपादन करुन दोन वर्षात रक्कम दाम दुप्पट करुन देतो, असा विश्वास दिला. त्यांच्या बोलण्याला बळी पडून भणगे यांना त्या सहा जणांनी तब्बल एक कोटी एकोणअंशी लाख रुपयांना चुना लावला.

- Advertisment -

ताज्या बातम्या