Saturday, November 9, 2024
Homeनगरकुणी ग्रामसेवक देता का ग्रामसेवक! खेडले-परमानंद ग्रामपंचायतीचा कारभार बेभरोसे

कुणी ग्रामसेवक देता का ग्रामसेवक! खेडले-परमानंद ग्रामपंचायतीचा कारभार बेभरोसे

करजगांव | वार्ताहर

“कोणी ग्रामसेवक देता का ग्रामसेवक!” अशी म्हणायची वेळ खेडले-परमानंद (ता. नेवासा) येथील नागरिकांवर आली आहे. गेल्या चार महिन्यांपासून ग्रामसेवकाविना खेडले-परमानंद ग्रामपंचायतीचा कारभार बेभरोसे चालु आहे.

- Advertisement -

विविध कारणाने खेडले-परमानंद ग्रामपंचायत या ना त्या कारणाने नेहमी चर्चेत राहत आहे. सद्या ग्रामपंचायतीचा कारभार ठप्प झाल्यामुळे गावातील नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.तसेच गावातील विकास कामावर ही परिणाम होत आहे. ग्रामपंचायतीला ग्रामसेवक नसल्याने जगदीश शिंदे, बबन गीते, बाबुराव वैरागर, भाऊसाहेब रोठे, संदीप राजळे, मोहन वैरागर, राहुल वैरागर, संतोष आंथळे, शनैश्वर वैरागर आदी ग्रामस्थांनी सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर यांना निवेदन दिले असुन त्वरीत ग्रामसेवकाची नेमणुक न केल्यास उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

विद्येच्या मंदिरात द्वेषाचे धडे! भरवर्गात मुस्लीम विद्यार्थ्याला उभं केलं आणि सर्व विद्यार्थ्यांना….

खेडले परमानंदसाठी स्वंतत्र ग्रामसेवकाची नेमणुकीची ऑर्डर झालेली आहे. सदर ग्रामसेवक लवकरच हजर होईल. तोपर्यंत ग्रामस्थांची कामे थांबु नये यासाठी ग्रामसेवक पाखरे यांच्याकडे अतिरीक्त चार्ज दिला आहे.

सुरेश पाटेकर (गटविकास अधिकारी नेवासा)

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या