नेवासा |तालुका प्रतिनिधि| Newasa
नेवासा शहरामधील कत्तलखान्यावर स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून 9 आरोपींंविरूध्द गुन्हा दाखल करून 13 लाख 40 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. शेंडे गल्ली भरावाजवळ काटवनात, नेवासा येथे नदीम सत्तार चौकरी व इतर इसमांनी गोवंश जातीची जिवंत जनावरे कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेली आढळून आली. स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांना येताना पाहून संशयित इसम पळून गेले. आसपासच्या नागरिकांना विचारपूस करून पळून गेलेल्या इसमांचे नाव विचारले असता त्यांची नावे नदीम सत्तार चौधरी, फिरोज अन्सार देशमुख, शोएब अलीम खाटीक, खलील उस्मान चौधरी, अबु शाहाबुद्दीन चौधरी, मोजी अबु चौधरी, जबी लतीफ चौधरी, अन्सार सत्तार चौधरी व अकील जाफर चौधरी सर्व रा. नाईकवाडी मोहल्ला, नेवासा खुर्द असे असल्याचे सांगितले.
पथकाने घटना ठिकाणावरून 13 लाख 40 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल त्यात 17 गायी, 6 कालवडी व 4 गोर्हे असा मुद्देमाल जप्त केला आहे. वरील 9 आरोपींविरूध्द नेवासा पोलीस स्टेशन गु.र.नं. 07/2025 महाराष्ट्र पशु संरक्षण अधिनियम सन 1995 चे सुधारीत 2015 चे कलम 5 (अ), 9 सह प्राण्यांना निर्दयतेने वागविण्याचा कायदा कलम 3, 11 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक वैभव कलबुर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली.