Friday, November 13, 2026
Homeक्रीडाभारताचा न्यूझीलंडकडून दारुण पराभव; ८९ धावांत अख्खा संघ बाद, एकदिवसीय इतिहासातील दुसरा...

भारताचा न्यूझीलंडकडून दारुण पराभव; ८९ धावांत अख्खा संघ बाद, एकदिवसीय इतिहासातील दुसरा सर्वात मोठा पराभव

मुंबई | Mumbai
न्यूझीलंडविरुद्धच्या चौथ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला. माऊंट माउंगानुई येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल 244 धावांनी धुव्वा उडवला. यासह पाच सामन्यांची वनडे मालिका आता २-१ अशी आहे. मॅट हेन्री व विल यंग हे न्यूझीलंड संघाच्या या मोठ्या विजयाचे हिरो ठरले. मॅट हेन्नीने या ९.४ षटकांत २७ धावा देत ६ विकेट्स घेतल्या.

या पराभवासह न्यूझीलंडविरुद्ध धावांच्या फरकाने झालेल्या भारताच्या सर्वात मोठ्या पराभवाची नोंद झाली आहे. यापूर्वी हा नकोसा विक्रम २०१० मध्ये भारताच्या नावावर झाला होता. १० ऑगस्ट २०१० रोजी दांबुला येथे झालेल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा २०० धावांनी पराभव केला होता. मात्र, चौथ्या वनडेत भारताला त्यापेक्षाही मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले.

- Advertisement -

दरम्यान, भारतीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठ्या पराभवाचा विक्रम थोडक्यात बचावला. धावांच्या फरकाने भारताचा सर्वात मोठा पराभव 245 धावांचा आहे. न्यूझीलंडने भारताला 244 धावांनी पराभूत केल्याने टीम इंडियाच्या नावावर आणखी एक नकोसा विक्रम नोंदवला जाण्यापासून केवळ एका धावेने बचावला. हा भारतीय संघाच्या वनडे इतिहासातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा पराभव ठरला.

पार्थ पवारांनी राष्ट्रवादीच्या आमदारांची तातडीने बैठक बोलवली; बैठकीत नेमकी काय चर्चा झाली? आमदाराने सगळंच सांगून टाकलं

भारताची निराशाजनक सुरवात
न्यूझीलंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ३३३ धावांचा डोंगर उभारला आणि भारताला विजयासाठी ३३४ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात भारतीय संघाची सुरूवात प्रचंड खराब झाली. मॅट हेन्रीने पहिल्याच षटकात न्यूझीलंड संघाच्या विजयाचा पाया रचला. त्याने पहिल्या षटकात भारताच्या दिग्गजांना माघारी धाडला. रोहित शर्मा पहिल्याच चेंडूवर गोल्डन डकवर बाद केले. त्यानंतर पाचव्या चेंडूवर विराटला बोल्ड केले आणि सहाव्या चेंडूवर श्रेयस अय्यरला पायचीत करत एकही धाव न देता ३ विकेट्स घेतल्या.

एकाच षटकात भारताने तीन महत्त्वाच्या विकेट गमावल्या. त्यामुळे भारतीय संघाची अवस्था बिकट झाली. सलामीला आलेल्या ऋतुराज गायकवाडलाही मोठी खेळी करता आली नाही. तो अवघ्या 5 धावा करून माघारी परतला. भारतीय संघाची धावसंख्या 9 वर पोहोचेपर्यंत चार फलंदाज तंबूत परतले होते. त्यानंतरही विकेट पडण्याचे सत्र सुरूच राहिले. न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर भारतीय फलंदाज पूर्णपणे निष्प्रभ ठरले.

त्यानंतर इशान किशन, अक्षर पटेल व नमन धीर यांनी कडवी झुंज देत संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. इशान किशन व अक्षर पटेलने चौथ्या विकेटसाठी ४४ धावांची भागीदारी रचली. मॅथ्यू फिशरने अक्षरला २१ धावांवर बाद करत ही भागीदारी तोडली. त्यानंतर लयीत असलेल्या मॅट हेन्नीने २१व्या षटकात इशान किशनला ३१ धावांवर क्लीन बोल्ड करत संघाला अजून एक धक्का दिला. त्यानंतर नमन धीर २१ धावा करत बाद झाला. यानंतर खालच्या फळीतील फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. परिणामी भारतीय संघ फक्त ८९ धावांवर सर्वबाद झाला. मॅट हेन्नीने या सामन्यात ६ विकेट्स, तर मॅथ्यू फिशरने ३ विकेट्स आणि काईल जेमिसनने १ विकेट घेतली.

भारताला चौथ्या वनडेत २४४ धावांनी पराभव स्वीकारावा लागला असला, तरी भारतीय संघाने मालिकेतील आघाडी कायम राखली आहे. भारताने मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले होते, तर तिसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता. आता चौथा सामना जिंकून न्यूझीलंडने मालिकेत पुनरागमन केले आहे. त्यामुळे मालिकेतील अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडला मालिका २-२ अशी बरोबरीत सोडवण्याची संधी असेल.

ताज्या बातम्या

राहुल

“पंतप्रधान नरेंद्र मोदी माझा फोन टॅप करत आहे”; राहुल गांधींच्या आरोपाने...

0
नवी दिल्ली | New Delhiकाँग्रेस आणि भाजपामध्ये मागील काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्यामुळे राजकारण चांगलंच तापल्याचं पाहायला मिळत आहे. असं असतानाच आता काँग्रेस नेते...