Sunday, September 8, 2024
Homeदेश विदेशआता वाहनाच्या काचेवर FASTag नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल!

आता वाहनाच्या काचेवर FASTag नसल्यास भरावा लागणार दुप्पट टोल!

दिल्ली । Delhi

सध्या महामार्गावर ये-जा करणाऱ्या सर्वच वाहनांसाठी टोल भरावा लागत आहे. एकाच वेळी असंख्य वाहने येत असल्याने टोल प्लाझावर वाहनांच्या रांगांच्या रांगा लागत होत्या. त्यामुळे फास्टॅग (FASTag) ही प्रणाली आणण्यात आली.

- Advertisement -

त्यानुसार बहुतांश वाहनांवर आपल्याला फास्टॅग पाहायला मिळतो. मात्र, अजूनही असे वाहनचालक आहेत त्यांच्या वाहनाच्या काचेवर फास्टॅग नाही.

पण आता जर वाहनाच्या काचेवर फास्टॅग नसेल तर तुम्हाला मोठा भुर्दंड सहन करावा लागणार आहे. वाहनाच्या काचेवर फास्टॅग नसल्यास दुप्पट टोल आकारण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.

हे देखील वाचा : हार्दिक-नताशाचा अखेर घटस्फोट, चार वर्षांनंतर संसार मोडला; पांड्याची भावनिक पोस्ट

याविषयी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. टोल संकलन करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. समोरच्या काचेवर फास्टॅग स्टिकर नसेल तर अशा वाहनचालकांकडून दुप्पट टोल वसूल करावा असे त्यात सांगण्यात आले आहे.

‘एनएचएआय’च्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, काही जण मुद्दामहून वाहनांच्या समाेरील काचेवर फास्टॅग स्टिकर चिकटवत नाहीत. त्यामुळे टाेल नाक्यांवर विनाकारण इतर वाहनांना विलंब हाेताे. त्यामुळे टाेल संकलन करणाऱ्या संस्थांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.

हे देखील वाचा : Air India चे विमान अमेरिकेऐवजी थेट 

समाेरच्या काचेवर फास्टॅग स्टिकर नसेल तर अशा वाहनचालकांकडून दुप्पट टाेल वसूल करावा, असे त्यात म्हटले आहे. असे फास्टॅग ‘ब्लॅकलिस्ट’देखील केले जाऊ शकतात. फास्टॅग नसलेल्या वाहनांचा नाेंदणी क्रमांक तसेच टाेल नाक्यावरील सीसीटीव्ही फुटेजदेखील जतन करून ठेवण्यात येणार आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या