Tuesday, July 16, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादेतून चौघांना उचलले-एनआयएची कारवाई 

औरंगाबादेतून चौघांना उचलले-एनआयएची कारवाई 

औरंगाबाद – aurangabad

- Advertisement -

राष्ट्रीय तपास संस्था (एनआयए) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) (ed) यांनी गुरुवारी देशातील 10 राज्यांमधील पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (पीएफआय) (Popular Front of India) नेत्यांच्या घरांवर दहशतवादविरोधी सर्वात मोठ्या कारवाईचा भाग म्हणून छापे टाकले. औरंगाबाद शहरातून चार जणांना उचलले असल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून कळते. अशीच कारवाई जालन्यात सुद्धा सुरू असल्याचे कळते.

औरंगाबादमध्ये बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

आतापर्यंत पीएफआयशी संबंधित 100 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे.  एनआयए आणि ईडीने राज्य पोलिसांसह 100 हून अधिक पीएफआय कार्यकर्त्यांना दहशतवादी कारवायांमध्ये सामील असलेल्यांना अटक केली आहे. महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांतील शहरांमध्ये छापे टाकले जात आहेत.

औरंगाबादेत कारवाई 

औरंगाबादच्या विविध भागातून पीएफआय या संघटनेची संबंधित असलेल्या चार जणांना एटीएसच्या पथकाने ताब्यात घेतले असून मुंबई पुणे ठाणे नाशिक या भागामधील एटीएसटी कारवाई सुरू आहे.

त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहरात पुणे व मुंबई येथील एटीएसचे पथक औरंगाबाद दाखल झाले होते. औरंगाबाद एटीएसच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामध्ये झोमॅटो डिलिव्हरी बॉय असलेला व पूर्वी पीएफआयशी संबंधित असलेला सैय्यद फैसल याला हडको भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. तर इमरान मिल्ली याला किराडपुरा तर इतर दोघांना अन्य भागातून ताब्यात घेण्यात आले आहे. सध्या या चौघांची चौकशी सुरू आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या