Friday, November 22, 2024
Homeनगरनिळवंडेच्या आवर्तनातून 15 गावांतील सर्व बंधारे भरून घ्या

निळवंडेच्या आवर्तनातून 15 गावांतील सर्व बंधारे भरून घ्या

आ. आशुतोष काळेंच्या अधिकार्‍यांना सूचना

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून पंधरा गावांतील सर्वच बंधारे भरून घ्या, अशा सूचना आ. आशुतोष काळे यांनी पंचायत समितीच्या अधिकार्‍यांना दिल्या. आ. काळे यांनी नुकतीच निळवंडे कालव्याच्या आवर्तनाच्या पार्श्वभूमीवर निळवंडे कालवे व पंचायत समितीच्या अधिकार्‍यांची बैठक घेतली. यावेळी अधिकार्‍यांना सूचना करताना त्यांनी सांगितले, हाडोळा पॉईंट व डांगेवाडी पॉईंट येथे एस्केप बांधा तसेच डांगेवाडी, हाडोळा पॉईंट व इतर ठिकाणाहून पाणी सोडून कोपरगाव तालुक्यातील पश्चिम भागातील पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरून घ्या.

- Advertisement -

कोपरगाव मतदार संघातील वाकडी, लांडेवाडी पॉईंट, चितळी-धनगरवाडी पॉईंट येथून पाणी सोडून सर्व बंधारे पूर्ण क्षमतेने भरून द्या. कोपरगाव तालुक्यातील काही बंधार्‍यांना भौगोलिक परिस्थितीमुळे निळवंडे कालव्यांच्या चार्‍यांमधून पाणी भरणे शक्य नाही. त्यामुळे हे बंधारे उजनी उपसा जलसिंचन योजनेच्या माध्यमातून भरावे लागणार आहे. त्यासाठी उजनी योजनेच्या किरकोळ दुरुस्तीचे राहिलेले काम तातडीने पूर्ण करा, अशा सूचना यावेळी आ. काळे यांनी अधिकार्‍यांना केल्या.
पावसाचे प्रमाण अत्यल्प असून मागील काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे.

अद्यापही मोठ्या पावसाची प्रतिक्षा आहे. निळवंडे कालव्याच्या आवर्तनातून बंधारे भरून घेतल्यास या गावात निर्माण झालेली अडचण दूर होणार असून खोलवर गेलेली भूजल पातळी भरून येण्यास मदत होणार आहे. त्याचा या पंधरा गावांतील शेतकर्‍यांना लाभ होणार आहे. यावेळी निळवंडे कालव्याचे उपविभागीय अभियंता महेश गायकवाड, शाखा अभियंता संदीप साबळे, पंचायत समिती अभियंता अश्विन वाघ आदी उपस्थित होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या