Thursday, September 19, 2024
Homeनगरनिळवंडे कालव्यांतून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा!

निळवंडे कालव्यांतून दुष्काळग्रस्त भागाला तातडीने पाणी सोडा!

आमदार बाळासाहेब थोरात यांची मागणी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे भंडारदरा (Bhandardara) व निळवंडे धरण (Nilwande Dam) भरले असून निळवंडे धरणाच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून ओहरफ्लोचे पाणी तातडीने दुष्काळग्रस्त भागाला सोडून जिरायत भागातील सर्व बंधारे भरून द्यावे, अशी मागणी निळवंडे धरण (Nilwande Dam) व कालव्यांचे निर्माते आमदार बाळासाहेब थोरात (MLA Balasaheb Thorat) यांनी केली आहे. निळवंडे धरण हे दुष्काळी भागातील 182 गावांसाठी निर्माण केले असून या भागाला हे धरण वरदान ठरणारे आहे. मागील आठवड्यात धरणाच्या पाणलोटक्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने भंडारदरा व निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाले आहे. असे असले तरी निळवंडेच्या लाभक्षेत्रात मात्र अत्यंत कमी पाऊस झाला असल्याने सर्व ओढे-नाले कोरडेठाक आहेत.

संगमनेर तालुका (sangamner) हा पर्जन्यछायेत असून येथे अत्यंत कमी पाऊस (Rain) झाला आहे. तसेच तळेगावसह दुष्काळी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये पाण्याची मोठी टंचाई आहे. मात्र, निळवंडे धरण ओव्हरफ्लो झाल्याने अतिरिक्त पाणी दुष्काळी भागाला प्राधान्याने दिले गेले पाहिजे. लाभक्षेत्रात कमी झालेला पाऊस, पाणीटंचाई (Water Shortage) यामुळे या नागरिकांना व शेतकर्‍यांना दिलासा मिळावा याकरीता सरकारने तातडीने निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या कालव्यांतून पाणी सोडून जिरायत भागातील सर्व पाझर तलाव व बंधारे तातडीने भरून द्यावेत.

संगमनेरसह उत्तर नगर जिल्हा हा पर्जन्यछायेत असून ऐन पावसाळ्यात सुद्धा अनेक गावांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. याचबरोबर पिण्याच्या पाण्यासह पशुधन वाचवणे हे देखील जिकिरीचे झाले आहे. पावसाची अशाश्वती आणि पुढील काळातील नियोजन याकरीता निळवंडे कालव्यांमधून येणार्‍या ओहरफ्लोच्या पाण्यातून संगमनेर (Sangamner), राहाता (Rahata) , कोपरगाव (Kopargav), राहुरी (Rahuri) या तालुक्यांतील लाभक्षेत्रातील शेतकरी व नागरिकांना भविष्यातील समस्यांमधून काहीसा दिलासा मिळणार आहे. तरी प्रशासनाने कोणताही वेळ वाया न घालवता तातडीने डाव्या आणि उजव्या कालव्यांना पाणी सोडून दुष्काळी भागातील सर्व बंधारे, पाझर तलाव भरून द्यावे अशी मागणी आमदार थोरात यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या