Friday, May 3, 2024
Homeनगरनिळवंडेत किती टक्के पाणी; वाचा सविस्तर

निळवंडेत किती टक्के पाणी; वाचा सविस्तर

भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara

पाणलोटातील चेरापुंजी समजल्या जाणार्‍या घाटघर आणि रतनवाडीत पावसाचा जोर ओसरल्याने भंडारदरातून सोडण्यात येणारा विसर्ग 2053 क्युसेकपर्यंत घटविण्यात आला आहे. असे असलेतरी 457 दलघफू पाणी नवीन आल्याने निळवंडेतील पाणीसाठा 53 टक्क्यांवर पोहचला आहे.

- Advertisement -

तीन चार दिवसांपासून पाणलोटात जोरदार पाऊस कोसळत असल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरा धरणातील पाणीसाठा 83 टक्के कायम ठेऊन मंगळवारी 6087 क्युसेकने प्रवरा नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. पण बुधवारी तो 2053 करण्यात आला.

काल सकाळी संपलेल्या 24 तासांत भंडारदरात 535 दलघफू तर निळवंडेत 457 दलघफू पाणी नवीन आले. या धरणातील काल सकाळी पाणीसाठा 4149 दलघफू (50.22टक्के) होता. त्यात आणखी वाढ होऊन सायंकाळी तो 8385 दलघफू (52.65 टक्के) झाला होता. दिवसभर पडलेल्या पावसाची भंडारदरातील नोंद केवळ 9 मिमी झाली. सायंकाळनंतर रिपरिप सुरू झाली होती.

गत 24 तासांत नोंदवला गेलेला पाऊस असा- भंडारदरा 63, घाटघर 123, पांजरे 106, रतनवाडी 127, वाकी 49 मिमी.

- Advertisment -

ताज्या बातम्या