Saturday, May 18, 2024
Homeनगरनिळवंडेत 2500 दलघफू पाणी

निळवंडेत 2500 दलघफू पाणी

भंडारदरा, कोतूळ |वार्ताहर| Bhandardara

भंडारदरा धरण पाणलोटात शुक्रवारच्या तुलनेत शनिवारी पावसाचा जोर काहीसा वाढल्याने धरणात सकाळपर्यंत 115 दलघफू पाणी नव्याने दाखल झाले. रविवारी 191 दलघफू पाणी आल्याने 11039 दलघफू क्षमतेच्या धरणात पाणीसाठा 7434 दलघफू झाला होता.

- Advertisement -

दोन-तीन दिवसांपासून पाणलोटात मान्सून पुन्हा सक्रीय झाल्याने अधूनमधून सरी कोसळत आहेत. त्यामुळे धरणात धिम्यागतीने पाणी येत आहे. काल दिवसभर भंडारदरात 13 मिमी पावसाची नोंद झाली. निळवंडे धरणात 88 दलघफू पाणी आले. पाणीसाठा 2502 दलघफू झाला होता.

मुळा पाणलोटातही रिपरिप सुरू असल्याने धरणाकडे धिम्या गतीने पाणी जात आहे. 47 दलघफू पाणी नव्याने दाखल झाल्याने काल सकाळी धरणातील पाणीसाठा10467 दलघफू झाला होता. तर कोतूळ येथे 8 मिमी पावसाची नोंद झाली. काल सकाळी येथील मुळेचा विसर्ग 3822 क्युसेकने सुरू होता. सायंकाळी तो 2984 क्युसेकपर्यंत आला होता. पण सायंकाळनंतर पाऊस वाढल्याने रात्री 9 वाजात विसर्ग पुन्हा 3212 क्युसेकवर आला होता. सध्या धरणात 10610 दलघफूच्या पुढे गेला होता. गतवर्षी या काळात मुळा धरणात 14434 दलघफू पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा पाऊसही कमी आहे आणि पाणीसाठा.

- Advertisment -

ताज्या बातम्या