Saturday, July 27, 2024
Homeनगरआमच्यामुळेच निळवंडेच्या डाव्या कालव्याला पाणी

आमच्यामुळेच निळवंडेच्या डाव्या कालव्याला पाणी

कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav

182 गावांना वरदान ठरणार्‍या निळवंडे कालव्यांच्या कामांना गती मिळावी यासाठी आ. आशुतोष काळे यांनी वेळोवेळी केलेला पाठपुरावा, अधिकार्‍यांच्या बैठका आणि अडचणीच्या वेळी केलेल्या मदतीतून अखेर निळवंडेच्या डाव्या कालव्याला गुरुवारी पाणी सोडण्यात आले.

- Advertisement -

काळे कारखान्याचे उपाध्यक्ष डॉ. मच्छिंद्र बर्डे यांच्या हस्ते, पाटबंधारे विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेक लव्हाट, महेश गायकवाड, सहा. अभियंता कदम यांच्या उपस्थितीत हे पाणी सोडण्यात आले आहे. यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या जिरायती भागातील नागरिकांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद व्यक्त केला. पाच दशकापासुनचे स्वप्न पूर्ण झाल्यामुळे कोपरगाव मतदार संघाच्या निळवंडे डाव्या कालव्याच्या लाभक्षेत्रातील नागरिकांनी आनंद व्यक्त करीत कालव्याचे पाण्यात उभे राहून आ. आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

निळवंडे धरणातून डाव्या कालव्याचे पाणी कोपरगावातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, रांजणगाव देशमुख, वेस, सोयेगाव, अंजनापूर, बहादरपूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबाद या तेरा गावात आणण्यासाठी पूर्व तयारी करतांना बुजविण्यात आलेले ओढे, नाले आ. आशुतोष काळे यांच्या सहकार्याने उकरण्यात आली असून सिमेंट पाईप देखील उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे जलद गतीने या गावांमध्ये पाणी येण्यास मदत होणार आहे.

कोपरगाव |प्रतिनिधी|Kopargav

सध्याच्या दुष्काळी परिस्थितीत पाण्याची गरज असताना माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर निळवंडे धरणातून डाव्या कालव्यात गुरुवारी पाणी सोडण्यात आले आहे.

निळवंडेच्या डाव्या कालव्यात पाणी सोडल्यामुळे तालुक्यातील काकडी, मल्हारवाडी, डांगेवाडी, मनेगाव, वेस, सोयगाव, बहादरपूर, रांजणगाव देशमुख, अंजनापूर, धोंडेवाडी, जवळके, शहापूर, बहादराबादसह मतदारसंघातील वाकडी, चितळी, धनगरवाडी या जिरायती गावातील पिण्याच्या व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांनी आनंद व्यक्त केला. पाणी सोडल्याबद्दल राज्य शासनाचे तसेच यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार्‍या स्नेहलता कोल्हे यांचे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी आभार मानले आहेत.

निळवंडे डाव्या कालव्याच्या वितरिकांचे काम अद्याप चालू असल्याने कालव्यांच्या लाभक्षेत्रातील गावांची भूजल पातळी वाढावी यासाठी कालव्याच्या आवर्तनातून या भागातील तलाव, बंधारे भरून देण्याबाबत जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना निर्देश देण्याची मागणी स्नेहलता कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. त्यानुसार स्नेहलता कोल्हे यांनी निळवंडेच्या डाव्या कालव्यात जलसंपदा विभागाचे उपकार्यकारी अभियंता विवेक लव्हाट, महेश गायकवाड, सहाय्यक अभियंता कदम यांच्या उपस्थितीत नारळ फोडून पाणी सोडण्यात आले.

- Advertisment -

ताज्या बातम्या