Monday, June 24, 2024
Homeनगरनिंबळक चौकाजवळील दोन अपघातात दोनजणांचा मृत्यू

निंबळक चौकाजवळील दोन अपघातात दोनजणांचा मृत्यू

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

- Advertisement -

नगर तालुक्यातील निंबळक बायपास (Nimblak Bypass) चौकात सोमवारी रात्री झालेल्या अपघातात (Accident) एकाचा मृत्यू (Death) झाला तर यात चौकातून जाणार्‍या रस्त्यावरील माळवाडी सर्कल छत्रपती संभाजी महाराज चौक येथे सोमवारी रात्रीच झालेल्या आणखी एका अपघातात एक जणाचा जागीच मृत्यू (Death) झाला. या दोघांपैकी निंबळक बायपास (Nimblak Bypass) चौकात झालेल्या अपघातातील (Accident) मृत नगर तालुक्यातील हिवरे बाजारचा (Hivare Bazar) असल्याचे सांगण्यात येते. दोघांचीही ओळख पटली नसल्याचे समजते.

गुरूजी शोधणार शाळेतील कुणबीच्या नोंदी

निंबळक बायपास (Nimblak Bypass) चौकात दररोज अपघात होत आहे. हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग आहे. बायपास झाल्यामुळे अवजड वाहनांची मोठ्या प्रमाणात वाहतूक होत आहे. हा रस्ता नगर-मनमाड महामार्गाला (Nagar Manmad Highway) जोडला असून याच चौकात अपघाताची मालिका चालू आहे. या चौकात गतिरोधक नसल्यामुळे वाहने जोरात येतात. पर्यायी अपघाताला सामोरे जावे लागण्याची वेळ आली आहे. अपघात (Accident) झाल्यानंतर वाहतुकीची कोंडीही मोठया प्रमाणात होते. या चौकात गतिरोधक बसवावे अन्यथा बायपासला रस्ता रोको आंदोलन केले जाईल, असा इशारा अजय लामखडे यांनी दिला आहे.

फसवणुकीची रक्कम एक कोटीच्या घरात; संशयित पसारमहापालिका : 25 विषयांना स्थायी समितीच्या सभेत मंजुरी

- Advertisment -

ताज्या बातम्या