Tuesday, May 28, 2024
Homeनगरतरुणाला लोखंडी पाईपने मारहाण

तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

भिंतीचे बांधकाम करू नका, असे समजून सांगण्यासाठी गेलेल्या तरुणाला लोखंडी पाईपने मारहाण केल्याची घटना रविवारी (दि. 16) दुपारी कोतकर वस्ती, निंबळक (ता. नगर) शिवारात घडली. पवन दिलीप जाधव (वय 36 रा. कातोरे वस्ती, बोल्हेगाव) असे मारहाण झालेल्या तरुणाचे नाव आहे.

- Advertisement -

त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून परसराम नवले (पूर्ण नाव माहिती नाही, रा. पितळे कॉलनी, बोल्हेगाव फाटा), भाऊसाहेब दिगंबर लामटुळे (रा. पितळे कॉलनी, बोल्हेगाव फाटा) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी हे रविवारी दुपारी त्यांच्या निंबळक बायपास येथील कोतकर वस्तीवर शॉपच्या व्यवहाराबाबत बोलणी करण्यासाठी गेले होते. तेथे नवले व लामटुळे हे शॉपच्या बाजूला भिंतीचे बांधकाम करत असताना त्यांना फिर्यादीने समजून सांगितले की,‘खरेदी पूर्ण झाल्यावर तुम्हाला बांधकाम करायचे ते करा’. दरम्यान, समजावून सांगितल्याचा राग आल्याने नवले व लामटुळे यांनी फिर्यादीला लोखंडी पाईपने मारहाण केली. ‘तु येथे परत आला तर तुझे हातपाय तोडून टाकीन’ असा दम दिला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस अंमलदार गणेश पालवे अधिक तपास करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या