Thursday, May 23, 2024
HomeनाशिकVideo : "आम्हाला नाही, तर तुम्हाला नाही"; थकीत वेतनासाठी निसाका कामगारांचे गांधीगिरी...

Video : “आम्हाला नाही, तर तुम्हाला नाही”; थकीत वेतनासाठी निसाका कामगारांचे गांधीगिरी मार्गाने भजन आंदोलन

निफाड | रावसाहेब उगले | Niphad

निफाड सहकारी साखर कारखान्याला (Niphad Cooperative Sugar Factory) व्यवस्थापनाने ९ महिन्यांतच कुलूप लावल्याने सुमारे साडेचारशे कामगारांच्या स्वप्नांवर पाणी फिरले आहे. त्यातच सद्यस्थितीतील थकीत तीन महिन्यांच्या वेतनापैकी दोन वेतन गुरुवारी (दि. २१) कामगारांना (Workers) अदा केल्यानंतर शुक्रवार (दि. २५) पासून कामावर न येण्यासंदर्भात नोटीस लावल्यामुळे खळबळ उडाली होती. यानंतर आज कामगारांनी गांधीगिरी मार्गाने भजन आंदोलन (Agitation) केले…

- Advertisement -

Pankaja Munde : पंकजा मुंडेंना जीएसटी आयुक्तालयाचा दणका; वैद्यनाथ सहकारी कारखान्याची १९ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त

यावेळी निसाका व्यवस्थापन व जिल्हा बँकेला (District Bank) कामगारांना पैसे देण्याची मानसिकता नाही. त्यामुळे “आम्हाला नाही तर तुम्हाला नाही”, अशी भूमिका कामगारांनी मांडली आहे. तसेच आधी कामगारांचे हित बघावे. महाराष्ट्रात इतके मोठे राजकारण घडत आहे. परंतु, कायदेशीर मार्गाने लढा दिल्यास यश नक्की मिळेल‌, असा विश्वास आज सोमवार (दि. २५) रोजी निफाड सहकारी साखर कारखान्याच्या गेटसमोर झालेल्या द्वारसभेत व्यक्त करण्यात आला.

Devendra Fadanvis : फडणवीसांनी नागपुरात पूरग्रस्तांना अरेरावी केली? ‘त्या’ व्हिडिओवर भाजपाचा खुलासा, काँग्रेसला लगावला टोला

दरम्यान, यावेळी जिल्हा बँकेच्याविरोधात कामगारांकडून गांधीगिरी मार्गाने भजन आंदोलन करण्यात आले. त्यानंतर साखळी उपोषण, बेमुदत उपोषण व बँकेविरुद्ध मूकमोर्चा (Silent Front) काढण्याचा इशारा देण्यात आला.

‘देशदूत’ / ‘सार्वमत’चे व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

निफाड साखर कारखान्याला ९ महिन्यात कुलूप; कामगारांच्या स्वप्नांवर पाणी, नोटीस लावल्यामुळे खळबळ

- Advertisment -

ताज्या बातम्या