Friday, September 18, 2026
Homeक्राईमनिठारी कांडातून निर्दोष सुटलेल्या सुरेंद्र कोलीची आत्महत्या; चहाच्या टपरीत आढळला मृतदेह

निठारी कांडातून निर्दोष सुटलेल्या सुरेंद्र कोलीची आत्महत्या; चहाच्या टपरीत आढळला मृतदेह

हरिद्वार | Haridwar
२००६ मधील बहुचर्चित आणि खळबळ उडवून देणाऱ्या निठारी हत्याकांडातील प्रमुख आरोपी म्हणून दीर्घकाळ चर्चेत राहिलेला सुरेंद्र कोली याचा हरिद्वारमध्ये मृत्यू झाला आहे. शुक्रवारी, १८ सप्टेंबर रोजी भूपतवाला परिसरातील एका चहाच्या टपरीत तो मृतावस्थेत आढळला. पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, त्याने आत्महत्या केली असावी. घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट आढळलेली नसून पोलिसांकडून मृत्यूच्या परिस्थितीचा तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरेंद्र कोली गेल्या काही महिन्यांपासून हरिद्वारमध्ये राहत होता. तो मूळचा उत्तराखंडमधील अल्मोडा जिल्ह्यातील भिकियासैंण क्षेत्राचा रहिवासी होता. सप्तऋषी पोलीस चौकीला माहिती मिळाली होती की, सप्त सरोवर रोडवरील एका चहाच्या दुकानात एक व्यक्ती मृतावस्थेत पडली आहे. पोलीस पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत मृत व्यक्तीची ओळख पटवली. हा व्यक्ती निठारी प्रकरणातील मुख्य आरोपी सुरेंद्र कोली असल्याचे स्पष्ट झाले. तो हरिद्वारमध्ये भाड्याने चहाची टपरी चालवून आपला निर्वाह करत होता.

- Advertisement -

Rahul Gandhi: आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस, आता तृणमूल काँग्रेस…प्रत्येकवेळी तोच…; राहुल गांधींची पोस्ट चर्चेत

प्राथमिक तपासामध्ये पोलिसांना दुकानातून कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मृत्यूचे नेमके कारण काय असावे, याची पुष्टी पोस्टमार्टम रिपोर्ट आणि सविस्तर तपासानंतरच समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. शहर कोतवाल कुंदन सिंह राणा यांनी सांगितले की, मृताची ओळख पटली असून पोलीस आजूबाजूच्या लोकांची चौकशी करत आहेत. सर्व बाजूंचा विचार करून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.

२९ डिसेंबर २००६ रोजी नोएडामधील निठारी भागात मोनिंदर सिंग पंढेर याच्या घरामागील नाल्यातून अनेक लहान मुलांचे सांगाडे सापडले होते. याप्रकरणी पंढेर आणि त्याचा नोकर सुरेंद्र कोली यांच्यावर १९ गुन्हे दाखल करण्यात आले होते. सत्र न्यायालयाने कोलीला १३ प्रकरणांमध्ये फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, ऑक्टोबर २०२३ मध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने पुराव्यांअभावी त्याला १२ प्रकरणांतून निर्दोष मुक्त केले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानेही या निर्दोष ठरवण्याच्या निकालावर शिक्कामोर्तब केले होते. सर्व प्रकरणांमधून सुटका झाल्यानंतर डिसेंबर २०२५ मध्ये सुरेंद्र कोलीची तुरुंगातून सुटका झाली होती.

ताज्या बातम्या

तृणमूल

तृणमूल काँग्रेसचं नाव बदललं! दोन्ही गटांना मिळालं नवं नाव अन् नवं...

0
कोलकाता | Kolkataकेंद्रीय निवडणुक आयोगाने ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव आणि चिन्ह गोठवल्यानंतर पश्चिम बंगालच्या राजकारणाच्या वादात निवडणूक आयोगाने महत्त्वाचा अंतरिम निर्णय घेतला आहे....