Saturday, October 17, 2026
Homeदेश विदेशRahul Gandhi: आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस, आता तृणमूल काँग्रेस...प्रत्येकवेळी तोच...; राहुल...

Rahul Gandhi: आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस, आता तृणमूल काँग्रेस…प्रत्येकवेळी तोच…; राहुल गांधींची पोस्ट चर्चेत

नवी दिल्ली | New Delhi
तृणमूल काँग्रेसच्या पक्षनाव आणि निवडणूक चिन्हाबाबत निवडणूक आयोगाने अंतरिम निर्णय घेतल्यामुळे आगामी निवडणुकीत तृणमूल काँग्रेसमधील दोन्ही गटांना नवीन चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षनाव व पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर सुनावणी चालू असताना दुसरीकडे निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसच्या निवडणूक चिन्हाबाबत घेतलेला निर्णय आता चर्चेत आला आहे. यावरुन आता काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांची सोशल मीडिया पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्षफुटीचा संदर्भ देत तृणमूल काँग्रेसच्या घडामोडींवर भाष्य केले.

Nashik Crime News: डॉ. मनिषा जेजूरकर आत्महत्या प्रकरण: संशयित डॉ. जेजुरकर यांना आत्मसमर्पणाचे निर्देश

- Advertisement -

“आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस”
विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले की, “आधी शिवसेना, मग राष्ट्रवादी काँग्रेस आणि आता तृणमूल काँग्रेस. प्रत्येकवेळी तोच पॅटर्न. भाजप आणि निवडणूक आयोग मिळून पक्ष फोडतात. मग त्या पक्षाचे निवडणूक चिन्ह हिसकावून घेतले जाते. जर आख्खा पक्षच चोरी होऊ शकतो, तर कोट्यवधी भारतीयांच्या मतांची चोरी होणे काही आश्चर्य वाटण्याची बाब नाही. वोट चोरी. सरकार चोरी. आता पक्षाचीदेखील चोरी. हे आपल्या लोकशाहीच्या पतनाचे प्रतीक झाले आहेत.” अशी टीका राहुल गांधींनी केली. “हा लढा केवळ ममता बॅनर्जींचा नाही. हा प्रत्येक राजकीय पक्षाचा, प्रत्येक मतदाराचा लढा आहे, ज्यांना मुक्त आणि निष्पक्ष निवडणुका हव्या आहेत,” असेही त्यांनी यावेळी म्हटले.

शिवसेना पक्ष चिन्हावर सुनावणी सुरु
सध्या सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्षनाव व पक्षचिन्हाच्या मुद्द्यावर सुनावणी चालू असून शिंदे गटाचे वकील नीरज कौल युक्तिवाद सादर करत आहेत. या युक्तिवादादरम्यान सर्वोच्च न्यायालयानेदेखील शिवसेनेचं पक्षचिन्ह एकनाथ शिंदे गटाला न देता गोठवलं का नाही? असा प्रश्न उपस्थित केला आहे. यावर निवडणूक आयोगाचा तो निर्णय कसा योग्य होता, यासंदर्भात एकनाथ शिंदे गटाकडून युक्तिवाद केला जात आहे. या पार्श्वभूमीवर आता निवडणूक आयोगाने तृणमूल काँग्रेसचं पक्षचिन्ह गोठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर राहुल गांधींनी त्याबाबत टीकात्मक पोस्ट शेअर केली आहे.

ताज्या बातम्या

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात दाखल

0
नवी दिल्ली, १६ ऑक्टोबर २०२६ : भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि देशाचे माजी उपपंतप्रधान लालकृष्ण आडवाणी यांना शुक्रवारी (१६ ऑक्टोबर) संध्याकाळी दिल्लीतील अपोलो रुग्णालयात...