Saturday, November 23, 2024
HomeमनोरंजनND Studio बनवण्याचं कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता!

ND Studio बनवण्याचं कारण ठरला होता हॉलिवूड अभिनेता!

मुंबई । Mumbai

मराठी तसेच हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी एनडी स्टुडिओमध्ये आत्महत्या करत आपलं आयुष्य संपवलं. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर संपूर्ण सिनेसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ज्या एनडी स्टुडिओमध्ये आपल्या करिअरची सुरूवात केली त्याच एनडी स्टुडिओमध्ये नितीन देसाई यांनी आपलं आयुष्य संपवलं. दरम्यान, नितीन देसाई यांनी या एनडी स्टुडिओला कसे उभारले त्या मागचे कारण हॉलिवूड अभिनेता ब्रॅड पीट.

- Advertisement -

नितीन देसाईंनी एका मुलाखतीत सांगितले होते की. अमेरिकन चित्रपट दिग्दर्शक ऑलिव्हर स्टोननं त्यांना कामासाठी एक ऑफर दिली होती. त्यांच्यासोबत ९ दिवस, लडाख, उदयपुर, महाराष्ट्र सारख्या शहरांमध्ये नितीन फिरले होते. त्यांना ब्रॅड पीटसोबत, एलेक्जेंडर-द ग्रेट हा चित्रपट बनवायचा होता. चित्रपटातील काही भाग हा भारतात शूट करायचा होता. आम्ही सगळ्या गोष्टींवर चर्चा केली, पण जेव्हा मी त्यांनी एका स्टुडिओमध्ये घेऊन गेलो तेव्हा ते थोडे नाराज झाले. त्यांच्या या चित्रपटाचं बजेट हे ६५० कोटींचं होतं. त्यासाठी त्यांना जे इंफ्रास्ट्रक्चर हवं होतं ते मिळत नव्हतं. तेव्हा मला वाटलं की असा स्टुडिओ पाहिजे जो पाहून इंटरनॅशनल लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या सगळ्या पूर्ण होतील. त्यासाठी खूप ठिकाणी गेल्यानंतर मला कर्जतमध्ये एनडी स्टुडिओ बवण्याची संधी मिळाली.

Nitin Desai Suicide: नितीन देसाईंनी का उचललं टोकाचं पाऊल? स्थानिक आमदार म्हणाले, “दीड महिन्यांपूर्वीच…”

२००३ मध्ये नितीन देसाई यांनी एनडी स्टुडिओची स्थापना केली. त्यांचा हा स्टुडिओ मुंबईपासून जवळ कर्जत येथे ४३ एकरच्या जमिनीवर आहे. स्टुडिओमध्ये २५००० फुटांचा एक विशाल डायनोसॉर फ्लोर, प्रॉप्स चेंबर आणि रॉयल पॅलेस, किल्ले, शहर, गावांचे ग्रँड लोकेशन्स आहेत. नितीन देसाई यांच्या या भव्य सेटला भारतातील पहिलं थीम पार्क म्हटलं जातं. एकेकाळी नितीन देसाई या स्टुडिओमध्ये एकाच वेळी २८ प्रोजेक्टवर काम करायचे. आजवर त्यांनी १९८ हून अधिक सिनेमे २०० हून अधिक टेलिव्हिजन मालिका आणि ३५० हून अधिक गेम शोसाठी कलादिग्दर्शक म्हणून काम केलं आहे. ‘हम दिल दे चुके सनम’, ‘माचिस’, ‘देवदास’, ‘लगान’, ‘जोधा अकबर’, ‘परिंदा’, ‘डॉन’, सारख्या भव्य सिनेमांचे सेट नितीन चंद्रकांत देसाई यांनी उभारले होते. कलाकार सिनेमाचं शुटींग संपवून पॅक अप झाल्यानंतरही सेटवर थांबून राहायचे. नितीन देसाई यांनी साकारलेल्या भव्य सेटवरून कलाकारांचा पाय निघत नसे.

नितीन देसाई यांच्या या स्टुडिओमध्ये सगळ्यात पहिलं शूटिंग हे आमिर खानच्या ‘मंगल पांडे-द राइजिंग’ या चित्रपटाचं झालं होतं. त्यानंतर मधुर भंडारकरच्या ‘ट्रॅफिक सिग्नल’ आणि आशुतोष गोवारिकर यांचा ‘जोधा अकबर’ शूट झाला होता. या चित्रपटासाठी हृतिक रोशन आणि ऐश्वर्या राय हे दोघे ही सहा महिने सेटवर होते. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांच्या जवळपास ६७ कार्यक्रमांसाठी त्यांनी काम केलं होतं. स्टॅच्यू ऑफ यूनिटीच्या इमॉग्रेशन प्रोग्रामसाठी देखील त्यांनी काम केलं होतं. समुद्रात ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणार आहेत. त्या ठिकाणी ते नरेंद्र मोदी यांना घेऊन गेले होते.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या