Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNitin Gadkari : "जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर..."; भाजपमधील इनकमिंगवरून गडकरींनी टोचले नेत्यांचे कान

Nitin Gadkari : “जुन्या कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या, नाहीतर…”; भाजपमधील इनकमिंगवरून गडकरींनी टोचले नेत्यांचे कान

मुंबई | Mumbai

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local Body Election) निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध राजकीय पक्षांतून महायुतीमध्ये (Mahayuti) जोरदार इनकमिंग सुरु आहे. त्यामुळे भाजपच्या (BJP) जुन्या कार्यकर्त्यांसह नेत्यांची घुसमट होतांना बघायला मिळत आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या कार्यकर्त्यांच्या असतात. त्यामुळे या निवडणुकीत कार्यकर्ता निवडणुकीच्या रिंगणात उतरत असतो. मात्र, इतर पक्षांतून येणाऱ्या पदाधिकाऱ्याला मोठे महत्व दिले जाते. यामुळे पक्षातील कार्यकर्त्यावर अन्याय होतो. यावरच केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी भाजपमध्ये इतर पक्षांतून होणाऱ्या इनकमिंगवरून नेत्यांना कानपिचक्या दिल्या आहेत.

- Advertisement -

नागपूरमधील (Nagpur) कळमेश्वर या ठिकाणी भाजपचे नेते राजू पोद्दार यांच्या कामांच्या आठवणींना उजाळा देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी गडकरी बोलत होते. यावेळी ते म्हणाले, “घर की मुर्गी दाल बराबर बाहेरुन आलेले सावजी चिकन” असा टोलाच त्यांनी या कार्यक्रमात लगावला. सावजी असल्याने बाहेरचा चिकन मसाला चांगला लागतो. जरा जुन्या लोकांकडे लक्ष ठेवा. आता मी तर नाही, तुम्ही नेतृत्व करता, कारण हे जोपासलेले कार्यकर्ते आहेत. त्यांची जर तुम्ही कदर केली नाही तर जेवढ्या जोराने वरती चालले आहात तेवढ्या जोराने खाली आपटल्याशिवाय राहणार नाही, असा खणखणीत टोला नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी भाजप नेत्यांना हाणला.

YouTube video player

दरम्यान, यावेळी व्यासपीठावर महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्यमंत्री आशिष जयस्वाल, माजी आमदार सुधाकर कोहळे, डॉ. राजू पोतदार आणि इतर मान्यवर उपस्थित होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जिंकण्याचा चंग भाजपने बांधला आहे. मुंबई महापालिकेसह (Mumbai NMC) राज्यातील जिल्हा परिषद आणि महापालिकेवर त्यांना कमळ फुलवायचे आहे. यासाठी त्यांनी काही ठिकाणी स्वबळाचा नारा दिला आहे. त्यासाठी भाजपमध्ये स्थानिक नेते येण्यास इच्छुक असल्याचे बोलले जात आहे.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : चाचडगाव टोलनाक्याजवळ ईरटीका-स्कॉर्पिओचा भीषण अपघात; चौघे जागीच...

0
दिंडोरी | Dindori तालुक्यातील नाशिक-पेठ रस्त्यावरील (Nashik-Peth Road) चाचडगाव टोलनाक्याजवळ (Chachadgaon Toll Plaza) ईरटीका आणि स्कॉर्पिओचा भीषण अपघात (Ertika-Scorpio Accident) झाल्याची घटना घडली आहे. या...