मुंबई | Mumbai
प्रसिद्ध किर्तनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या मुलीचा नुकताच साखरपुडा झाला आहे. या कार्यक्रमावर प्रचंड खर्च करण्यात आला, यावरून आता इंदुरीकर महाराज यांच्यावर टीका होत आहे. महाराजांची कन्या ज्ञानेश्वरीच्या साखरपुड्याचा न्यारा थाट दिसला. मात्र, या साखरपुड्यातील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्ध किर्तनकार आणि समाजप्रभोधनकार निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज टिकेचे धनी ठरले. वारकरी संप्रदायाकडून त्यांच्यावर टीका झाली. किर्तनात साधी लग्न करण्याचा उपदेश देणारे महाराज लेकीच्या साखरपुड्यात पैशांची उधळण करताना दिसले अशी टीका त्यांच्यावर झाली.
कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांची कन्या ज्ञानेश्वरीचा साखरपुडा नुकताच संगमनेर येथील ‘वसंत लॉन्स’ येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यात त्यांच्या लेकीची मंगल कार्यालयात शाही एन्ट्री… गाड्यांचा मोठा ताफा… अंगावरचे कपडे, ओपन जिप आणि मुलीचा गाडीच्या बाहेर येत तो शाही थाट चर्चेचा विषय बनला. दुसऱ्यांना साधेपणाने लग्न करण्याचे उपदेश देणार महाराज आपल्या मुलीचा साखरपुडा सोहळा मात्र चांगला मोठा साजरा करतात असे म्हणत त्यांच्यावरती सोशल मीडियातून व्यक्तीगत टीका झाल्या, या टीकेमुळे इंदुरीकर महाराजांना मोठा मानसिक त्रासाला सामोरे जावे लागल्याचे दिसून येत आहे. परिणामी त्यांनी त्यांच्या एका किर्तनामध्ये याबाबतची खंत व्यक्त करत थेट कीर्तन सोडण्याचा निर्णय घेतला आहे.
आम्ही आमचा संसार किती कष्टातून मोठा केला
“आम्ही किती कष्ट केली लोक याचा विचार करत नाहीत, आम्ही आमचा संसार किती कष्टातून मोठा केला याचा विचार लोक करत नाहीत, आमची पोरं लहान असताना आठ-आठ दिवस माझी त्यांच्याशी गाठ नव्हती. आणि आता लोक इतके खाली गेलेत, की माझ्या मुलीच्या अंगात कपडे कसेत, यावरुन लोकांचे कमेंट्स आहेत. याच्यापेक्षा वाईट काय असेल? आता चार दिवसांपासून माझ्या मुलीच्या अंगातील कपड्यावर लोकांनी बातम्या तयार केल्या, पण तिच्या बापाला…मला तुम्ही घोडे लावा.. माझा पिंड गेलाय… माझ्या मुलाचा आणि मुलीचा यात काय दोष आहे. पण या कॅमेरावाल्यांनी आठ दिवसात माझं जगणं मुश्किल करुन टाकलंय. काय… मला एक सांगा.. मुलगी तुम्हालाही आहे. तुमच्या मुलीच्या कपड्यावर एखाद्याने कमेंट केली, तर तुम्हाला काय वाटेल?
एवढे बोलत आहे की माझं जगणं मुश्कील केलं आहे
मुलीच्या कपड्यांवर टीका करणाऱ्यांना इंदुरीकर महाराज यांनी चांगलेच झापले असून त्यांची अक्कल देखील काढली. इंदुरीकर म्हणाले, आता लोकं इतके खाली गेले की आता माझ्या मुलीच्या लग्नाच्या कपड्यावर बोलत आहे. एवढं बोलत आहे ती माझं जगणं मुश्कील केलं आहे. साखरपुड्यासाठी आपल्याकडे मुलीला कपडे कोण घेतो… मुलीचा बाप घेतो की मुलाकडचे घेतात… हे तुम्हीच सांगा, साखरपुड्यासाठी कपडे नवऱ्याकडचे आणतात एवढी अक्कल पाहिजे. पण आता ते माझ्या लेकीवर बोलत आहे… लोकं किती नालायक असावा पण किती याला मर्यादा आहे.
दोन-तीन दिवसात मी निर्णय घेणार आहे
माणूस नालायक असावा पण किती..त्यामुळे मी कंटाळलो आहे. दोन-तीन दिवसात मी थांबणार आहे. आता बास झाले. लोकांच्या शिव्या खाऊन आयुष्यात सगळं चांगलंच केलं, आयुष्यात चांगलं करुन त्याचं फळ काय मिळाले…माझ्यापर्यंत ठीक होतं, पण घरापर्यंत जायला नको होतं. यांना उत्तरे द्यायला मी आजही समर्थ आहे. मला अजून दोन वर्षे आयुष्य आहे. पण कुटुंबापर्यंत गेल्यावर मज्जा नाही. याची अक्कल इंदुरीकरांनाच आली पाहिजे, त्याने कीर्तने बंदच केली पाहिजेत. दोन-तीन दिवसांत मी निर्णय घेणार आहे. मज्जा नाही राहिली.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




