Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यामनपा नोकर भरती प्रक्रिया खासगी संस्थेमार्फत होणार

मनपा नोकर भरती प्रक्रिया खासगी संस्थेमार्फत होणार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

मागील 24 वर्षात नाशिक महापालिकेत नोकर भरती ( NMC Recruitment )झालेली नाही. नोकरभरती व्हावी, यासाठी भारतीय जनता पक्षाच्या (BJP)सत्ता काळात महापौर सतीश कुलकर्णी यांनी विशेष महासभा घेऊन नोकर भरतीचा प्रस्ताव पारित करुन शासनाकडे पाठवण्यात आला होता. मात्र त्याला मंजुरी मिळालेली नव्हती.

- Advertisement -

दरम्यान, फायरमनसह अभियंता व डॉक्टर या तीन संवर्गातील पदे भरण्यासंदर्भात मागच्या महिन्यातच तत्कालीन नगर विकास मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली होती. त्यानुसार नाशिक महापालिका खासगी नामांकित संस्थेच्या(private reputed organization) माध्यमातून भरती प्रक्रिया सुरू करणार असून तीन कंपन्यांशी बोलणी सुरू असल्याची माहिती महापालिका आयुक्त तथा प्रशासक रमेश पवार( NMC Commissioner Ramesh Pawar ) यांनी दिली.

मनपाकडे फायरमनची संख्या अत्यल्प असून राज्य शासनाने सेवा नियमावलीला मान्यता दिल्याने महापालिकेत लवकरच 206 फायरमनची भरती होणार आहे. भरती प्रक्रियेत राजकीय इतर हस्तक्षेप टाळण्यासाठी त्रयस्थ एजन्सीमार्फत ही भरती करण्यात येेणार आहे. त्यासाठी तीन एजन्सींचा विचार सुरू आहे. त्यातील दोन जणांनी तयारी दर्शवली आहे.

महापालिकेचा कर्मचारी भरतीचा आकृतीबंध गेल्या सात ते आठ वर्षांपासून राज्य शासनाकडे पडून आहेत. तो मंजूर होत नसेल तर किमान फायरमन, वैद्यकीय विभाग आणि अत्यावश्यक अभियंते भरण्याची तरी परवानगी द्यावी,यासाठी महापालिकेचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता.

त्यानुसार राज्य शासनाने फायरमन, वैद्यकीय अधिकारी आणि अभियंते भरण्याची परवानगी दिली असली तरी सेवा नियमांचा अडथळा होता.गेल्या महिन्यात तत्कालीन नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिकेच्या सेवा प्रवेश नियमावलीवर स्वाक्षरी केली आणि हा तिढा सुटला.

दरम्यान, नाशिक महापालिकेच्या वतीने भरतीची तयारी करण्यात आली असली तरी सर्वप्रथम फायरमनची भरती करण्यात येणार आहे. त्याचे सेवानियम प्राप्त झाले असून त्यानुसार त्रयस्थ संस्था नियुक्त करण्यात येणार आहे. त्यासाठी महापालिकेने टीसीएस, आयबीपीएस आणि एमकेसीएल या संस्थांना पत्र दिले होते.

शासन मान्य संस्थांच्या यादीत असलेल्या तीन संस्थांना महापालिकेने पत्र पाठवले होते. या तीन्ही संस्था भरती प्रक्रिया सुरक्षित पध्दतीने करण्यासाठी नावाजलेल्या आहेत.त्यामुळे गोपनीयता बाळगून आणि अत्यंत निष्पक्षपणे भरती होईल.

रमेश पवार, मनपा आयुक्त

- Advertisment -

ताज्या बातम्या