Saturday, February 7, 2026
Homeदेश विदेशPiyush Goyal: भारतीय शेतकऱ्यांना कराराचा फटका बसणार? मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांचा...

Piyush Goyal: भारतीय शेतकऱ्यांना कराराचा फटका बसणार? मंत्री पियुष गोयल यांनी विरोधकांचा दावा खोडला, म्हणाले, काही लोक…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करारामुळे भारतीय शेतकरी आणि कृषी क्षेत्र धोक्यात आल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. एकीकडे विरोध असताना दुसरीकडे या व्यापार करारामुळे भारतीय निर्यातदारांसाठी मोठी संधी निर्माण झाल्याचे मत सत्ताधारी करत आहेत. अशामध्ये आता या प्रकरणावर केंद्रीय वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी शेतकऱ्यांना या कराराचा फटका बसणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

देशाचे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी आताच घेतलेल्या पत्रकार परिषदेत या चिंता निरर्थक असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या मते हा करार दबावाखाली झालेला नाही. या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे आणि कृषी क्षेत्राचे कोणतेही नुकसान होणार नाही. या कराराविषयी त्यांनी संक्षिप्तपणे काही ठळक मुद्दे समोर आणले आहेत.

- Advertisement -

अनपेक्षित सरप्राइज! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती, चर्चांना उधाण

YouTube video player

या करारामुळे भारतीय शेतकऱ्यांचे तसेच कृषी क्षेत्राचे कोणतेही नुकसान होणार नाही, असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे. या कराराअंतर्गत अनेक भारतीय वस्तूंवर अमेरिकेमध्ये रिसिप्रोकल टॅरिफ शून्य टक्के असेल. भविष्याचा विचार करून भारताने हा करार केला आहे. ते यावेळेस म्हणाले की, दुग्धव्यवसाय, तांदूळ आणि भरडधान्य (मिलेट्स) यांसारख्या संवेदनशील क्षेत्रांमध्ये भारताने अमेरिकेला कोणतीही सवलत दिलेली नाही. त्यामुळे देशातील शेतकरी आणि दुग्ध उद्योगाचे हित सुरक्षित राहिले आहे.

भारतीय शेतकऱ्यांचे नुकसान होईल हे दावे खोटे
काही लोक भारतीय शेतकऱ्यांची चिंता करण्याचे ढोंग करतात. पण त्यांना त्यांची चिंता नाही. भारत आणि अमेरिकेतील या व्यापारी करारामुळे भारतीय शेतकऱ्यांना नुकसान होईल असे दावे खोटे असल्याचा दावा मंत्री पीयूष गोयल यांनी केला. अमेरिकेतून आयात वस्तू, उत्पादनं आणि कृषी संबंधित कोणत्याही वस्तू, उपकरणं, सयंत्र यांच्यावर कोणतीही आयात सवलत देण्यात आलेली नाही असे गोयल यांनी स्पष्ट केले. कृषी क्षेत्रात आता इतर वस्तूमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही, असे गोयल म्हणाले.

भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारात स्पर्धात्मक फायदा मिळणार
मंत्री पियुष गोयल पुढे म्हणाले की, “भारत – अमेरिका करारामुळे पूर्वी भारतीय वस्तूंवर आकारला जाणारा 50 टक्के शुल्क आता फक्त 18 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात आला आहे. हा दर भारताच्या शेजारी देशांपेक्षा कमी असल्याने भारतीय निर्यातदारांना जागतिक बाजारात स्पर्धात्मक फायदा मिळणार आहे,” असे ते म्हणाले. “अमेरिकेतून आयात वस्तू, उत्पादनं आणि कृषी संबंधित कोणत्याही वस्तू, उपकरणं, सयंत्र यांच्यावर कोणतीही आयात सवलत देण्यात आलेली नाही असे गोयल यांनी स्पष्ट केले. कृषी क्षेत्रात आता इतर वस्तूमुळे शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही,” असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

ताज्या बातम्या

सलमान

अनपेक्षित सरप्राइज! राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला सलमान खानची उपस्थिती, चर्चांना उधाण

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त मुंबईत संघाच्या वतीने संवाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला अभिनेता सलमान खानने हजेरी लावलीय. मुंबईतील...