Saturday, April 26, 2025
Homeब्रेकिंग न्यूजराज्यात मतदान यंत्रात छेडछाड नाही - मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

राज्यात मतदान यंत्रात छेडछाड नाही – मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे स्पष्टीकरण

मुंबई | प्रतिनिधी Mumbai

महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या मतदानादरम्यान मतदान यंत्रात ( ईव्हीएम) कुठल्याही प्रकारची छेडछाड झालेली नाही. राज्यात मतदान प्रक्रिया सुरळीत आणि शांततेत पार पडली असल्याचे स्पष्टीकरण राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने शनिवारी केले.

- Advertisement -

राज्यात अलीकडेच लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचे पाच टप्पे पार पडले. मात्र, मतदानादरम्यान मतदान प्रक्रियेला बाधा आणणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न करणारे व्हिडिओ समाजमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. त्यावरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवत पारदर्शक प्रक्रियेवर शंका उपस्थित केली होती.

या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने वरील खुलासा केला आहे. सामाज माध्यमात प्रसारित झालेल्या व्हिडिओची पडताळणी केली असता मतदान प्रक्रिया बाधित होणारे आणि ईव्हीएममध्ये छेडछाडीचा प्रयत्न होत असल्याचे दाखविले जाणारे व्हिडिओ जुने असून ते इतर राज्यातील आहेत. या व्हिडिओंचा नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्रातील निवडणुकीशी काहीही संबंध नाही, असा दावा करतानाच राज्यातील मतदान प्रक्रिया ही संपूर्णपणे शांततेत आणि सुरळीत झाली असल्याचे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांच्या कुटुंबियांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून सांत्वन

0
पुणे । प्रतिनिधी Pune जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या कौस्तुभ गणबोटे आणि संतोष जगदाळे या पर्यटकांच्या घरी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस...