Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशलस घेतली नाही, मग 5 हजार कर भरा

लस घेतली नाही, मग 5 हजार कर भरा

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाविरोधातील लढा यशस्वी झालेला नाही. कोरोनावर लसीकरण (vaccine)हा यशस्वी मात्रा असला तरी अनेक जण लस घेण्यास टाळाटाळ करत असतात. जे नागरिक कोरोना लसीकरण करून घेणार नाहीत, त्यांच्याकडून अतिरिक्त कर (tax)आकारण्याचा निर्णय कॅनडातील (Canana) क्यूबेक (Quebec) या प्रांताने घेतला आहे. भारतातही लसीकरण न करणाऱ्यांना मोफत रेशन बंद करण्याचा विचार केला जात आहे.

बुस्टर डोससाठी पात्रता, अटी काय? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर

- Advertisement -

लसीकरणाला नकार देणारे नागरिक हा आरोग्य व्यवस्थेवर येणारा एक मोठा ताण असून त्याचा सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. असे नागरिक स्वतः लस घेत नसल्यामुळे ते असुरक्षित असतात आणि कोरोना विषाणूचा प्रसार होण्यासाठी कारणीभूत ठरतात असा दावा करण्यात आला आहे. लस न घेतलेल्यांकडून 80 कॅनेडियन डॉलर म्हणजे भारतीय चलनातील सुमारे 5 हजार रुपये इतका टॅक्स आकारला जाणार आहे. क्यूबेकमध्ये फक्त 10 टक्के लोक आहेत ज्यांना लसीचा एकही डोस मिळालेला नाही. अशा लोकांना लसीकरण झालेल्या 90 टक्के लोकांना नुकसान करण्याचा अधिकार नाही असं म्हटलं आहे. या निर्णयातून अपवादात्मक कारणांसाठी लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींना वगळण्यात येणार आहे. अनेक व्यक्तींना लसीकरण न करून घेण्याचा सल्ला डॉक्टरांकडून दिला जातो. अशा प्रकारे वैद्यकीय कारणांसाठी लसीकरण न करणाऱ्या व्यक्तींवर हा कर लादण्यात येणार नाही असंही स्पष्ट केलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या