Sunday, April 27, 2025
Homeदेश विदेशNobel Prize For Economics : अर्थशास्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा; राजकीय, सामाजिक संस्थांचा...

Nobel Prize For Economics : अर्थशास्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा; राजकीय, सामाजिक संस्थांचा समाजावरील परिणाम जगाला दाखवला

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्काराची सोमवारी (१४ ऑक्टोबर) घोषणा करण्यात आली. डेरॉन ऐसमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला आहे. विविध राजकीय आणि सामाजिक संस्थांची निर्मिती आणि त्यांचा समाजाच्या प्रगतीवर होणारा परिणाम याविषयी केलेल्या संशोधनासाठी त्यांना हा सन्मान मिळाला आहे. या तिन्ही अर्थतज्ज्ञांनी वर्षानुवर्षे प्रगती करूनही गरीब देशांचा श्रीमंत देशांसारखा विकास कसा होऊ शकला नाही, हे सांगितले आहे.

नोबेल पुरस्कार समितीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत घोषणा केली आहे. डेरॉन ऐसमोग्लू, सायमन जॉन्सन आणि जेम्स रॉबिन्सन यांना ‘संस्थांची उभारणी कशी होते आणि त्यांचा समृद्धीवर परिणाम’ या अभ्यासासाठी नोबेल जाहीर करण्यात आले.

- Advertisement -

तीन स्तरीय मॉडेल काय?
प्रथम- संसाधनांचे वितरण कसे केले जाते? समाजात निर्णय घेण्याचा अधिकार कोणाकडे आहे? याच आधारावर श्रीमंत वर्ग आणि सामान्य लोक यांच्यात संघर्ष आहे. दुसरे म्हणजे, जनता संघटित होऊन कधी कधी सत्ताधारी वर्गाला धमकावते. असे करून तो सरकारला त्याच्या म्हणण्याशी सहमती देतो. त्यामुळे समाजाची शक्ती केवळ काही निर्णय घेण्यापुरती मर्यादित नाही, असे म्हणता येईल. तिसरे म्हणजे अनेकवेळा श्रीमंत शासक वर्गाला निर्णय घेण्याचे अधिकार जनतेच्या हाती देण्यास भाग पाडले जाते.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Crime News : महिला प्रवाशाची पर्स चोरट्याने केली लंपास, पोलिसांत तक्रार...

0
शिरूर । तालुका प्रतिनिधी शिरूर परिसरात एका प्रवाशाची पर्स अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली आहे. या चोरीत १६ ग्रॅम सोन्याचे दागिने, ८८ हजार रुपये...