Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या“बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा...”; भावाबद्दल लोकसभेत सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

“बहिणीचं कल्याण व्हावं, असं वाटणारा…”; भावाबद्दल लोकसभेत सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

नवी दिल्ली | New Delhi

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत महिला आरक्षणाचं विधेयक मांडलं. या विधेयकावर आज लोकसभेत चर्चा सुरु आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी लोकसभेत आपली भूमिका मांडली. दरम्यान यावेळी सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अमित शाह यांच्या विधानाचा उल्लेख करत सूचक विधान केलं आहे. आपल्या बहिणीचं चांगलं कल्याण व्हावं, असं वाटणारा भाऊ प्रत्येकाच्या घरात नसतो. प्रत्येकाचं एवढं चांगलं नशीब नसतं, असं सूचक विधान सुप्रिया सुळे यांनी केलं. त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या बोलण्याचा रोख नेमका कुणाकडे? याबाबत तर्क-वितर्क लावले जात आहे.

- Advertisement -

सुप्रिया सुळे नेमकं काय म्हणाल्या?

सुप्रिया सुळे संसदेत बोलायला उभा राहिताच त्यांनी महिला विधेयकाचे स्वागत केलं. महिला विधेयक चांगले आणि महत्त्वाचे असल्याचं त्या म्हणाल्या. दरम्यान, महिला आरक्षणावर आज चर्चा सुरू आहे पण मी इतर काही मुद्द्यांकडे लक्ष वेधू इच्छिते. सध्या कॅनडाच्या मुद्द्यावर चर्चा व्हायला हवी. महाराष्ट्रात मराठा, धनगर, लिंगायत, मुस्लिम या समाजांच्या आरक्षणाचा मुद्दा महत्त्वाचा आहे. याशिवाय इतरही काही महत्त्वाचे विषय आहेत. त्यावर चर्चा झाल्यास आम्ही सरकारची साथ देऊ. अमित शहा यांनी एक विधान केलं इथं की भाऊ का करू शकत नाही, भाऊसुद्धा करू शकतो. पण प्रत्येक घरात असे भाऊ नसतात जे बहिणीच्या कल्याणाचा विचार करतात. प्रत्येकाचं नशीब इतकं चांगलं नसतं असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. आता सुप्रिया सुळे यांच्या या विधानाचा संबंध राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट आणि अजित पवार हे भाजपसोबत गेल्याच्या घटनेशी जोडला जात आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या