Friday, May 3, 2024
Homeनाशिकआता खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करता येणार; पण काही अटी!

आता खाजगी ट्रॅव्हल्सने प्रवास करता येणार; पण काही अटी!

नाशिक | Nashik

एसटी महामंडळाच्या आंतरजिल्हा बस प्रवासापाठाेपाठ आता खासगी ट्रॅव्हल बसेसलाही आंतर जिल्हा प्रवाशी वाहतुकीस राज्य परिवहन विभागाने परवानगी दिली आहे. पण…

- Advertisement -

मानक कार्यप्रणालीचे (एसआेपी) पालन करूनच ही सेवा सुरू करावी, असे निर्देश परिवहन सह आयुक्तांनी सर्व प्रादेशिक परिवहन आधिकाऱ्यांना दिले आहेत.

आता आंतरजिल्हा प्रवासावरील निर्बंध दूर करण्यात आले असून या प्रवासास परवानगी देण्यात आली आहे.

त्यासाठी वेगवेगळ्या परवानगीची आवश्यकता असणार नाही. एसआेपी कार्यपध्दतीनुसारच खासगी बसेसचे संचालन होत आहे कि नाही हे पाहण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमखांची असेल, असे निर्देेश परिवहन आयुक्तांच्या मान्यतेने परिवहन सहआयुक्त अ. ना. भालचंद्र यांनी दिले आहेत.

अशी आहे एसआेपी

खाजगी प्रवासी बस ऑपरेटर व चालकाने बस स्वच्छ व निर्जंतुक स्थितीत ठेवणे आवश्यक.

प्रवासाच्या प्रत्येक दिवशी व फेरीअंती बसचे निर्जंतुकीकरण करावे.

बसचे आरक्षण कक्ष, चाैकशी कक्षाची वेळोवेळी स्वच्छता करावी. तसेच या ठिकाणी उपस्थित कामगारांनी मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.

बसेस जिथे उभ्या राहतात त्याठिकाणी गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

मास्क घातलेल्या प्रवाशांनाच बसमध्ये प्रवेश द्यावा, बसच्या प्रवेशव्दारानवळ सॅनेटायझर ठेवावे. बसमध्ये काही अतिरिक्त मास्क ठेवावे.

प्रवाशांची थर्मल गनद्वारे तपासणी करावी.

एखादया प्रवाशास ताप, सर्दी, खोकला या प्रकारची कराेना ची प्राथमिक लक्षणे दिसल्यास, अशा प्रवाशांना प्रवास करण्यास प्रतिबंध करावा.

बसमध्ये प्रवासी एका आड एक पध्दतीने आसनस्थ होतील, याचे नियाेजन करावे.

स्लिपर बसमध्ये डबल बर्थवर एक प्रवासी, स्वतंत्र सिंगल बर्थवर एक प्रवासी याचीच परवानगी.

प्रवासादरम्यान जेवण, अल्पोपहार, प्रसाधनगृहाचा वापर या कारणाकरिता बस थांबविताना ही ठिकाणे स्वच्छ आहेत याची खात्री चालकाने करावी.

बसमध्ये चढताना व उतरताना तसेच खानपानाकरिता व प्रसाधनगृहाच्या वापराकरिता प्रवासादरम्यान

बसचे निर्जंतुकीकरण करणे तसेच त्याचे अभिलेख ठेवणे ही जबाबदारी परवानाधारकाची असेल.

तर हाेईल कारवाई

वरील सूचनांचे पालन न केल्यास परवानाधारकाविरुद्ध मोटार वाहन अधिनियम, १९८८, केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९, आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ मधील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल.

- Advertisment -

ताज्या बातम्या