Wednesday, February 4, 2026
Homeक्राईमCrime News : पोषण आहार वाहतूक व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

Crime News : पोषण आहार वाहतूक व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी

वाहनांची तोडफोड करून नुकसान || सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शालेय पोषण योजनेअंतर्गत काम करणार्‍या शालेय पोषण आहार वाहतूक व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याच्या उद्देशाने तत्कालीन सुपरवायझरने साथीदारांसह गोडावूनवर हल्ला करून वाहने फोडल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दत्ता सोनवणे (रा. कल्याण रस्ता, नालेगाव) याच्यासह त्याच्या पाच ते सहा अनोळखी साथीदारांविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात खंडणी व इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत सागर पाटील (रा. नवनागापूर) यांनी सोमवारी (2 फेब्रुवारी) फिर्याद दिली आहे. फिर्यादी पाटील हे केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शालेय पोषण योजनेअंतर्गत जिल्ह्यातील शाळांना पोषण आहार पुरवठा करतात. त्यांच्याकडे 22 मालवाहतूक वाहने असून, जुना बोल्हेगाव रस्त्यावरील गोडावूनमधून हा पुरवठा केला जातो. फिर्यादीत नमूद केल्यानुसार, जून 2025 मध्ये दत्ता सोनवणे यास सुपरवायझर म्हणून कामावर ठेवण्यात आले होते. मात्र, कामातील हलगर्जीपणा, चालक व कर्मचार्‍यांना दमदाटी करणे तसेच पैशांची बेकायदेशीर मागणी केल्यामुळे नोव्हेंबर 2025 मध्ये त्याला कामावरून काढून टाकण्यात आले. त्यानंतर सोनवणे याने पाटील यांना वारंवार फोन करून एक लाख रूपयांची खंडणी मागण्यास सुरूवात केली.

YouTube video player

पैसे न दिल्यास व्यवसाय बंद पाडण्याची, गोडावून जाळण्याची व जिवे मारण्याची धमकीही देण्यात आली. जीवितास धोका असल्याने जानेवारी 2026 च्या शेवटच्या आठवड्यात पाटील यांनी सोनवणे याला खंडणीपोटी 50 हजार रूपये रोख दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे. दरम्यान, उर्वरित रक्कम न दिल्याचा राग धरून रविवारी (1 फेब्रुवारी) रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास दत्ता सोनवणे हा पाच ते सहा अनोळखी व्यक्तींना घेऊन गोडावूनवर आला. त्यांनी गोडावूनमध्ये उभ्या असलेल्या वाहनांवर दगड, खुर्च्या फेकून मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. मध्ये पडणार्‍या कर्मचार्‍यांना जिवे मारण्याची धमकी दिली. वाहनाची तोडफोड करून एक लाख 10 हजार रूपयांचे नुकसान झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

ताज्या बातम्या

Rahuri : नदीपात्रात पाय घसरून पडल्याने इसमाचा मृत्यू

0
राहुरी |प्रतिनिधी| Rahuri राहुरी तालुक्यातील सात्रळ येथील प्रवरा नदीपात्रात पाय घसरून पडल्याने एका 40 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दत्तात्रय गोकुळ निकम...