Friday, April 25, 2025
Homeब्रेकिंग न्यूजLakshman Hake: लक्ष्मण हाके यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

Lakshman Hake: लक्ष्मण हाके यांना जीवे मारण्याची धमकी; व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

मुंबई । Mumbai

राज्यातील राजकीय वातावरण सध्या चांगलंच तापलेलं आहे. एकीकडे संतोष देशमुख हत्याप्रकरणावरून आरोप प्रत्यारोप सुरु आहेत, तर दुसरीकडे मनोज जरांगे आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake ) यांच्यात शाब्दिक युद्ध सुरु आहे. अशातच एक मोठी बातमी समोर येतेय.

- Advertisement -

ओबीसी नेते लक्ष्मण हाके (Laxman Hake ) यांना मनोज जरांगे (Manoj Jarange ) यांच्या समर्थकांकडून धमकी देण्यात आली आहे, असा आरोप हाकेंनी केला आहे. धमकीचा व्हिडीओ देखील लक्ष्मण हाके यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये लक्ष्मण हाके फोनवर बोलत असून समोरील माणूस त्यांना धमकी देत असल्याचे दिसत आहे. उठसूठ तुम्ही मराठ्यांना बोलताय, मनोज जरांगेंना बोलताय, असं समोरचा माणूस म्हणाला. त्यावर लक्ष्मण हाके म्हणतायेत, “मनोज जरांगे यांनीही स्वत:चं घरदार बघाव ना.

या आरोपांनांतर लक्ष्मण हाके यांनी पत्रकार परिषद घेत यावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले, मला राज्यभरातून शेकडो धमक्यांचे फोन येत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत. मला शिवीगाळ केली गेली. मला जीवे मारण्याची धमकी दिलीय.

दरम्यान, संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालंय. वाल्मीक कराडसह इतर आरोपींवर मकोका कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी करत देशमुख कुटुंबियांनी आंदोलन सुरू केलं आहे. संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांचं टाकीवर चढून आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील हेसुद्धा आंदोलनस्थळी दाखल झाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

अजित

Ajit Pawar: अजित दादांनी केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या ‘मी पुन्हा येईन’...

0
पुणे | Pune मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना पुस्तक लिहायला सांगणार असल्याचे वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या हस्ते आज पुण्यात राज्य कुटुंब कल्याण भवन...