Saturday, May 18, 2024
Homeमहाराष्ट्रOBC आरक्षणाचा फैसला लांबणीवर, विशेष खंडपीठ स्थापन करणार

OBC आरक्षणाचा फैसला लांबणीवर, विशेष खंडपीठ स्थापन करणार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्रातील ९२ नगरपरिषदांच्या ओबीसी आरक्षणासंबंधित आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार होती.

- Advertisement -

परंतु ही सुनावणी आता पाच आठवड्यांनी पुढे ढकलण्यात आली आहे. ओबीसी आरक्षणासाठी विशेष खंडपीठ स्थापन करताना जैसे थे परिस्थिती ठेवाण्याचे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

दरम्यान महाराष्ट्रात ओबीसींच्या राजकीय आरक्षणामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका खूप दिवस रखडल्या आहेत, त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने राज्यात सत्तांतर झाल्यावर ओबीसींना राजकीय आरक्षण लागू केल्यामुळे हा तिढा सुटला.

पण राज्यातील ज्या ९२ नगरपरिषदांची निवडणूक प्रक्रिया अगोदर सुरू झाली होती अशा नगरपालिकामध्ये हे आरक्षण लागू होणार नाही असे आदेश न्यायालयाने दिले होते.

कुठे होणार होत्या निवडणुका

पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव,अहमदनगर, औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, अमरावती आणि बुलढाणा या १७ जिल्ह्यातील ९२ नगर परिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये निवडणुका होणार होत्या.

- Advertisment -

ताज्या बातम्या