Monday, July 22, 2024
HomeUncategorizedइंस्टाग्राम खाते हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट 

इंस्टाग्राम खाते हॅक करून आक्षेपार्ह पोस्ट 

छत्रपती संभाजीनगर- Chhatrapati Sambhajinagar

- Advertisement -

इंस्टाग्राम खाते हॅक करून दोन समाजांत जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोस्ट टाकणाऱ्या खातेधारकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, या खातेधारकाने आपले सोशल मीडियावरील खाते हॅक करून कोणीतरी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची तक्रार सायबर पोलिसांकडे दाखल केली आहे. या प्रकरणी दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका खातेधारकाने जयघोषाचा नारा टाकला होता. या पोस्टनंतर एका दुसर्‍या युजरने एका विशिष्ट धर्माच्या भावना दुखावतील अशी पोस्ट टाकली. तसेच दुसर्‍या एका युजरनेही अशीच आक्षेपार्ह पोस्ट टाकून दोन धर्मांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी दोन युजर्सविरोधात सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याच प्रकरणात जयघोषाबाबत पहिल्या युजरच्या खात्यावरून टाकलेल्या पोस्टबाबत कटकटगेटमधील मुशरफ सय्यद अख्तर (१८) याने २४ मे रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मोबाईलमधील इंस्टाग्रामचे खाते उघडण्याचा प्रयत्न केला असता ते लॉक असल्याचे दिसले. तसेच त्याच्या खात्याची माहितीही बदलण्यात आली. परंतु, २६ मे रोजी त्याच्या एका मित्राने त्याच्या खात्यावरून आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याची माहिती दिली.

या माहितीवरून मुशरफ अख्तर यांनी आधी जिन्सी पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला असता जिन्सी पोलिसांनी सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचे सांगितले. या प्रकरणी संबंधिताविरोधात सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रवीणा यादव यांनी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या