Friday, May 17, 2024
Homeधुळेअरे बापरे.. धुळे मनपा सभागृहात ‘या’ शब्दावर व्यक्त झाला संताप

अरे बापरे.. धुळे मनपा सभागृहात ‘या’ शब्दावर व्यक्त झाला संताप

धुळे Dhule । प्रतिनिधी

कुंभकर्णी झोप (Kumbhakarni sleep) सारखे शब्दप्रयोग (word usage) सभागृहात करु नये असा सल्ला आयुक्त देविदास टेकाळे (Commissioner Devidas Tekale) यांनी किरण अहिरराव यांना दिला. यामुळे सभागृहात सदस्यांनी संताप (Members are outraged) व्यक्त केला.

- Advertisement -

महापालिकेच्या स्थायी समितीची सभा सभापती शीतल नवले यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी आयुक्त देविदास टेकाळे, अतिरिक्त आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त संगिता नांदुरकर, नगरसचिव मनोज वाघ, साबीर शेख, संजय जाधव, नागसेन बोरसे, प्रतिभा चौधरी, किरण कुलेवार, फातेमा अन्सारी, नाजियाबानो पठाण आदी उपस्थित आदी होते.

किरण अहिरराव या आपल्या प्रभागातील समस्या मांडत असतांना प्रशासन कुंभकर्णी झोपेतून कधी जागे होणार? असा सवाल उपस्थित केला.

तर आयुक्त देविदास टेकाळे यांनी यावर आक्षेप घेवून कुंभकर्णी झोप सारखे शब्दप्रयोग सभागृहात करु नये, सभापती शीतल नवले यांनीही प्रशासनाची बाजू घेत अधिकारी आपापल्या परीने काम करत असल्याचे सांगितले. याचवेळी नागसेन बोरसे म्हणाले, आम्ही सभागृहात ओरडून ओरडून थकतो, तरीही कामे होत नाहीत. नाईलाजाने आम्हाला न्यायालयात जावे लागते. नागरिक आम्हाला जाब विचारतात, घेराव घालतात. त्यांना आम्ही काय उत्तर द्यायचे? कुंभकर्णी झोप ही शिवी आहे का? असा सवाल उपस्थित करताच सदस्यांना दाबून मारायचे असेल तर सभाच घेवू नका, असेही त्यांनी सांगितले. त्यानंतर उर्वरित सदस्यांनीही टेबल वाजवून त्यांना समर्थन दिले.

आयत्यावेळच्या विषयावर बोलताना किरण अहिराव म्हणाले की, गेल्या सात महिन्यांपासून माझ्या प्रभागातील रस्ते, पथदिव्यांचा प्रश्न मांडत आहे. मात्र, साधा मुरुम देखील टाकला जात नाही. कुत्रे चावल्याने शहरात दोन जणांचा बळी गेला, आता खड्ड्यात पडून बळी जाण्याची वाट पहात आहात का? कुंभकर्णी झोपेतून कधी जागे होणार? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यावर सभापती श्री. नवले म्हणाले, जिल्हाधिकार्‍यांकडे कालच बैठक झाली. त्यात हद्दवाढीतील गावांना मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी शासनाला प्रस्ताव पाठविला आहे. स्वतः पाठपुरावा करुन निधी मंजुरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सोमवारपासून 18 कॉलन्यांमध्ये पथदिवे बसविण्यास सुरवात होईल, असेही आश्वासन त्यांनी दिले.

प्रतिभा चौधरी यांनी आपल्या प्रभागातील महिलांच्या शौचालयांची अवस्था अतिशय बिकट झाली असल्याचा मुद्दा मांडला.

यावेळी नाजियाबानो पठाण यांनी स्वाईन फ्लू बाबत मनपाने काय उपाययोजना केल्या आहेत, याची विचारणा केली. फातेमा अन्सारी यांनी, कबिरगंज, अंबिका नगर, बोरसे कॉलनी भागात रस्ते व गटारी नसल्याची समस्या मांडली.

... तर गुन्हा दाखल होईल

नटराज टॉकीज परिसरातील रस्ता 22 लाख रुपये खर्चातून करण्यात आला. त्यानंतर तातडीने बिल अदा करण्यात आले. या रस्त्याला तीन महिनेही झालेले नाहीत आणि हा रस्ता आता खोदण्यात आला आहे. त्यामुळे रस्ताच चोरीला गेला असून याबाबत गुन्हे दाखल करण्याची कारवाई करावी, अशी मागणी नागसेन बोरसे यांनी केली. त्यावर सभापतींनी चौकशी करून त्यात तथ्य आढळल्यास गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे सांगितले.

मनपाच्या गाळ्यांवर कारवाई करणार – सभापती

अण्णाभाऊ साठे नगरातील घरकुलांजवळील मनपाच्या 12 गाळ्यांचा प्रश्न संजय जाधव यांनी उपस्थित केला. हे मनपाचे गाळे असतांना खाजगी लोकांनी तीन ते चार लाख रुपये अनामत घेवून भाड्याने दिले आहेत, तसेच ते भाडेही कमवित आहेत. त्यांच्यावर मनपा कारवाई का करत नाही? असा सवाल उपस्थित करण्यात आला. त्यावर यात तथ्य असल्यास उद्याच पोलिस बंदोबस्तात दुकाने खाली केली जातील असे सभापती शीतल नवले यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या