Saturday, July 27, 2024
Homeनगरजनावरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

जनावरे चारण्यासाठी गेलेल्या वृद्ध शेतकर्‍यावर बिबट्याचा हल्ला

पारनेर |तालुका प्रतिनिधी| Parner

पानोली (Panoli) येथील पवळदरा (Pavaldara) परिसरात मोहन पवार (वय 65) हे वृद्ध शेतकरी आज सकाळी 9 वाजता जनावरे चारण्यास गेले असता बिबट्याने (Leopard) त्यांच्यावर अचानक हल्ला (Attack) केला. बिबटयाला प्रतिकार करण्यासाठी मोहन पवार व त्यांचा मुलगा सचिन पवार यांनी बिबट्याला (Leopard) काठीने मारण्याचा प्रयत्न केला. परंतु या हल्ल्यात मोहन पवार हे गंभीर जखमी झाले असून प्राथमिक उपचारासाठी त्यांना पारनेर (Parner) येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

- Advertisement -

खुर्चीसाठी महाविकास आघाडीत जावून संधी साधली त्याचे काय?

यापूर्वीही पवळदरा, सिद्धेश्वरवाडी, गाडेकर मळा, माळवाडी, वडुले रस्ता येथे अनेक वेळेस बिबट्याचे दर्शन झालेले आहे. वन खात्यालाही (Forest Department) या पूर्वी अनेक वेळा स्थानिक रहिवाशांनी वन खात्याकडे या सबंधी पत्र व्यवहार केला. अनेक ठिकाणी पिंजरेही लावण्यात आले होते. परंतु बिबट्याला (Leopard) जेरबंद करण्यासाठी त्यांना यश आले नाही. परंतु मोहन पवार यांच्यावर झालेल्या आजच्या हल्ल्यामुळे (Attack) पानोली व परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. बिबट्याला जेरबंद करण्यासाठी परिसरातून मागणी करण्यात येत आहे.

नगरमधील तरूणाकडून 24 लाखांचे अमली पदार्थ जप्तजिल्ह्यावर अवकाळीचे संकटनगर-पुणे महामार्गावर मोटारसायकला अपघात; एक ठार

- Advertisment -

ताज्या बातम्या