Sunday, April 27, 2025
Homeक्राईम७ ग्रॅम सोन्याच्या बाळीसाठी वृद्धाचा कानच कापला

७ ग्रॅम सोन्याच्या बाळीसाठी वृद्धाचा कानच कापला

नंदुरबार | दि.२७| प्रतिनिधी

७ ग्रॅम सोन्याच्या बाळीसाठी ७८ वर्षीय वृद्धाचा कान कापून त्यानंतर डोक्यावर वार करुन जिवे ठार मारण्यात आल्याची घटना बलवंड ता.नंदुरबार शिवारात घडली. याप्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याबाबत पोली सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साक्री तालुक्यातील एैचाळे येथील भटा मखन बोरसे (वय ७८) यांचे बलवंड (ता.नंदुरबार) शिवारात गट नंबर २९६ मध्ये शेत आहे. शेतात त्यांनी पत्र्याचे घर बांधले आहे.

त्यांच्या कानात ७ ग्रॅम वजनाची सोन्याची बाळी होती. काल दि.२५ जून रोजी सायंकाळी ४.३० च्या सुमारास ते शेतात आले.

रात्री ते पत्र्याच्या घरासमोर खाटेवर झोपलेले असतांना सायंकाळ ते सकाळी ८.३० वाजेदरम्यान अज्ञात मारेकर्‍याने त्यांच्या कानातील सोन्याच्या बाळीसाठी ब्लेडने त्यांचे कान कापले. त्यानंतर कोणत्यातरी वस्तूने त्यांच्या डोक्यावर वार करुन जीवेठार केले.

सदर घटना दि.२६ जून रोजी सकाळी ८.३० वाजेच्या सुमारास उघडकीस आली. त्यानंतर पोलीसांचे पथक त्याठिकाणी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर भटा बोरसे यांचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

घटनास्थळी ब्लेड आढळून आले आहे. याबाबत अशोक भटा बोरसे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात मारेकर्‍याविरुद्ध भादंवि कलम ३०२, ३९४, ३९७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

वकिलांनी कायदेशीरदृष्ट्या अद्ययावत रहावे – न्या. जैन

0
नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad गतिमान न्यायदान करताना वकिलांनी चौकस राहून वेळोवेळी कायद्यात होणार्‍या बदलांचा सखोल अभ्यास करावा व अद्ययावत राहावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाचे...