कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
मुख्यमंत्र्यांनी मला आपल्याला हे सांगण्यासाठी पाठवलेलं आहे की, तुमच्या ज्या काय मागण्या असतील जुन्या पेन्शन (Old Pension) आणि नवीन पेन्शनमध्ये जो काय फरक तुम्हाला वाटतो या संदर्भात आपण निश्चितपणे चर्चा करू. जे शिष्टमंडळ असेल त्यांना तुम्ही निमंत्रित करा एक आठवड्यामध्ये त्यांच्याबरोबर बैठक घेतली जाईल असे आश्वासन शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांनी कोपरगाव येथे जुन्या पेन्शन संदर्भात राज्यस्तरीय महाअधिवेशनादरम्यान सरकारच्यावतीने बोलतांना दिले.
यावेळी बोलतांना केसरकर म्हणाले, आपल्या मागण्यासंदर्भात निश्चितपणे कुठेतरी आपल्याला एकत्र बसायला लागेल. महाराष्ट्र शासन असे एकमेव आहे की, जे ठरलेल्या वेळेला आपली पेन्शन देते तुमच्या अकाउंटला जमा होते. आमच्या शिक्षकांचा थेट पगार आपल्या अकाउंटला जमा होतो अशा पद्धतीने महाराष्ट्र शासन काम करते आणि त्याच्यामुळे आपण एकत्र बसुन पेन्शनच्या बाबतीत काय सुधारणा करायची आपण शंभर टक्के सुधारणा करू हे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे. मला तुमचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी पाठविले आहे. या म्हणण्यामधून आपण काय करू शकतो ते तुम्ही समजून घ्या आणि ते करण्याचा आपला निश्चितपणे प्रयत्न राहील हेच आश्वासन आपल्याला मुख्यमंत्री यांनी दिलेल आहे.
आठ दिवसात मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) व संघटनेच्या प्रमुख पदाधिकार्यासमवेत बैठक घेऊ शेवटी आपण एक गोष्ट लक्षात घ्या की राज्य असच चालत नाही. राज्यामध्ये काही नियम पाळावे लागतात बोलाची कढी आणि बोलाचा भात चालत नसतो. इथे प्रत्येक क्षण पैसे हे प्रत्येकाच्या अकाउंटला ठरलेल्या दिवशी महाराष्ट्रामध्ये जमा होत असतात आणि ती परंपरा महाराष्ट्राची आपल्याला कायम ठेवायची आहे. अशी अनेक राज्य आहेत जी पाच पाच महिने आपल्या सरकारी नोकरांचा पगार देत नाही. तसं महाराष्ट्र राज्य नाही. महाराष्ट्र (Maharashtra) राज्यामध्ये तुमच्याशी चर्चा होते निर्णय घेतले जातात. आणि जे निर्णय घेतले जातात त्याची अंमलबजावणी सुद्धा ठरलेल्या दिवशी केली जाते.