Sunday, June 8, 2025
Homeनगरओंकार बेद्रेची जागतिक सर्वश्रेष्ठ 100 छायाचित्रकारांमध्ये निवड

ओंकार बेद्रेची जागतिक सर्वश्रेष्ठ 100 छायाचित्रकारांमध्ये निवड

अहमदनगर|प्रतिनिधी|Ahmednagar

- Advertisement -

35 फोटो प्रो या प्रोफेशनल फोटोग्राफी कम्युनिटी, रशिया यांनी नुकत्याच आयोजित केलेल्या 35 अवॉर्ड्स या आंतरराष्ट्रीय फोटोग्राफी स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामध्ये नगरच्या ओंकार रवींद्र बेद्रे यांचा जागतिक स्तरावरील पहिल्या 100 सर्वश्रेष्ठ वन्यजीव छायाचित्रकारांमध्ये समावेश झालेला आहे. त्याचप्रमाणे ओंकारने काढलेल्या छायाचित्रांचा समावेश पहिल्या सर्वश्रेष्ठ 50 छायाचित्रांमध्ये झालेला आहे.

या स्पर्धेमध्ये 173 देशांतील 1 लाख 17 हजार 541 छायाचित्रकारांनी सहभाग घेतला होता. 4 लाख 18 हजार छायाचित्र सदर स्पर्धेसाठी आले. या स्पर्धेचे परीक्षण जगातील 50 देशांतील 50 नामांकित छायाचित्रकारांनी केले आहे. या स्पर्धेमध्ये ओंकार यांनी काढलेल्या सूर्यास्ताच्या वेळी उभा असलेला काळवीट या छायाचित्राचा जागतिक स्तरावर पहिल्या 50 छायाचित्रांमध्ये समावेश झालेला आहे.

या स्पर्धेमध्ये सर्वश्रेष्ठ 100 छायाचित्रे व सर्वश्रेष्ठ 100 छायाचित्रकारांमध्ये भारतातील फक्त 10 छायाचित्रकारांचा समावेश असून त्यापैकी एक ओंकार बेद्रे आहेत. ओंकारने मिळविलेल्या यशामुळे अहमदनगरचं नाव जागतिक पातळीवर गेले आहे. ओंकार यांनी वयाच्या विसाव्या वर्षी मिळविलेल्या यशाबद्दल समाजातील सर्व स्तरांमधून त्यांचे अभिनंदन होत आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Shrirampur : माजी आमदार मुरकुटे, छल्लारे यांनी समर्थकांसह हाती घेतले ‘शिवधनुष्य’

0
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur अनेक दिवसांपासूनच्या पक्षप्रवेशाच्या चर्चेला काल अखेर माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी समर्थकांसह आपले नातू नीरज मुरकुटे यांना घेऊन शिवसेना शिंदे गटात प्रवेश...