दिल्ली । Delhi
रक्षाबंधनाचा (Raksha Bandhan) सण हा केवळ पारंपारिक उत्सव नसून तो आपल्या भावांप्रती प्रेम व्यक्त करण्याचा आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे. सीमेवर तैनात असलेले सैनिक (Army personnel) देशाच्या सुरक्षेत महत्त्वाची भूमिका बजावतातच, पण सण-उत्सवाच्या काळात ते कुटुंबापासून दूर राहतात.
रक्षाबंधनाच्या या पवित्र सणानिमित्त जम्मू-काश्मीरच्या (Jammu & Kashmir) उरी सेक्टरमधील (Uri sector) सोनी (Soni) गावात एक खास उपक्रम पाहायला मिळाला. सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांना राखी आणि मिठाई देऊन स्थानिक लोकांनी कृतज्ञता व्यक्त केली. एलओसी (नियंत्रण रेषा) जवळ असलेले सोनी गाव येथे रक्षाबंधनाच्या दिवशी स्थानिक लोक राखी बांधण्याचा आणि आपल्या सैनिक बांधवांना मिठाई देण्याचा अनोखा सण साजरा करतात.
हे हि वाचा : उद्धव ठाकरेंमुळेच राज ठाकरेंना बाहेर पडावे लागले; शिंदेंचा गंभीर आरोप
दरवर्षी रक्षाबंधनाला या गावात एक विशेष सण साजरा केला जातो, ज्यामध्ये स्थानिक महिला आणि मुले सैनिकांसोबत हा सण साजरा करतात. दरम्यान, काही मुस्लीम महिलांनी जवानांना राखी बांधली आहे. हे दृश फार सुंदर होते. जवानांचा आनंद तुम्ही व्हिडीओमध्ये पाहू शकता.
हे हि वाचा : कोलकाता बलात्कार प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाने घेतली दखल