Saturday, July 27, 2024
Homeनाशिक'ईद-ए-मिलाद'निमित्त विविध उपक्रम

‘ईद-ए-मिलाद’निमित्त विविध उपक्रम

जुने नाशिक | प्रतिनिधी

ईद-ए-मिलाद अर्थात पैगंबर जयंती निमित्त यंदा उर्दू १ रबीऊल अव्वल (१७ सप्टेंबर) ते १२ रबीऊल अव्वल (२८ सप्टेंबर) या १२ दिवसांच्या काळात शहरात ‘रहमतुल-लिल-आलमीन’ अभियानांतर्गत १२ वेगवेगळे उपक्रम राबविण्यात येणार आहे. यात वृक्षारोपण, विशेष स्वच्छता मोहीम, विद्यार्थ्यांमध्ये विविध स्पर्धा, हजरत पैगंबर साहेब यांच्यावर आधारित क्यूज कॉम्पिटिशन, आरोग्य शिबीरसह इतर उपक्रम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती हाफिज समीर कोकणी यांनी दिली.

- Advertisement -

शहरातील तहेरिके आशिक-ए- रसूल व ज्येष्ठ धर्मगुरू ऑल इंडिया सुन्नी जामिअतुल उलेमाचे अध्यक्ष हजरत मोईन मिया यांच्या मार्गदर्शनाखाली यंदा पहिल्यांदाच १२ दिवस कार्यक्रम होणार आहे. नाशिक शहर व जिल्ह्यात ईद-ए-मिलाद पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. त्यामुळे ती वैशिष्ट्यपूर्ण ठरते.

ईदनिमित्त मोठ्या प्रमाणात धार्मिक विधी केले जातात, तसेच शहरातील जुने नाशिक परिसरातील चौक मंडई येथून मिरवणूक अर्थात, जुलूस काढण्यात येतो. या भव्य जुलूसमध्ये मुस्लिमबांधव मोठ्या संख्येने सहभागी होतात. या जुलुसाची सांगता बडी दर्गा येथे करण्यात येते. इस्लामच्या शिकवणीनुसार जुलूसनिमित्त सर्वत्र सुख-शांती नांदावी, मानवाची सर्व त्रासांपासून सुटका व्हावी, यासाठी प्रार्थना करण्यात येते. यंदा, मात्र जुलूससह शहरात विविध कार्यक्रम होणार आहे.

२८ सप्टेंबरला ‘शांतता दिवस’

२८सप्टेंबरला अत्यंत महत्त्वाचा दिवस समजला जाणारा पैगंबर साहेब जयंतीचा दिवस अर्थात ईद मिलादच्या दिवशी ‘यौमे अमन’ म्हणजे शांतता दिवस पाळून अभियानाची सांगता केली जाणार आहे .

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या