Saturday, July 27, 2024
Homeनाशिकशासन आपल्या दारी उपक्रमाला उदंड प्रतिसाद

शासन आपल्या दारी उपक्रमाला उदंड प्रतिसाद

नवीन नाशिक | प्रतिनिधी

स्व. धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभाग क्र.२४ मध्ये “जनकल्याणकारी शासन आपल्या दारी” राबवण्यात आले. समाजातील शेवटच्या व्यक्तींपर्यंत शासनाच्या योजना पोचवण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. या उपक्रमात सातत्य ठेवण्याचे कार्य शिवसेना महानगरप्रमुख प्रविण(बंटी) तिदमे यांनी केले असल्याचे गौरवोद्गार नाशिक चे खासदार हेमंत गोडसे यांनी यावेळी केले.

- Advertisement -

कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार हेमंत गोडसे यांच्या हस्ते करण्यात आले. स्व.धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मृतिदिनानिमित्त प्रभाग क्र.२४ येथील नवग्रह शनि मंदिरात “जनकल्याणकारी शासन आपल्या दारी” राबवण्यात आले. खासदार गोडसे यांच्या हस्ते श्री शनी देवाचे पूजन आणि हिंदुह्रयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शासनाच्या योजना समाजातील प्रत्येक घटकापर्यंत पोहचविण्यासाठी हा उपक्रम शहरातील प्रत्येक प्रभागात राबवावा, असे आवाहन शिवसेना महानगरप्रमुख प्रविण तिदमे यांनी शासकीय अधिकाऱ्यांना केले.

उपक्रमात २२५० नागरिकांनी सुविधांचा लाभ घेतला. शासन आपल्या दारी उपक्रमात जिल्हा पुरवठा विभाग, जिल्हा उद्योग केंद्र, समाज कल्याण विभाग, पोस्ट विभाग, नाशिक महापालिका, महिला आर्थिक विकास महामंडळ, राष्ट्रीय क्षय रोग विभाग, कौशल्य विकास विभाग आणि आपले सरकार केंद्र धारकांचा समावेश होता. यात विविध लाभार्थ्यांना एकाच छताखाली शासकीय योजनांचा लाभ देण्यात आला.

यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख गणेश कदम, माजी प्रभाग सभापती सुवर्णा मटाले, नाशिक लोकसभा संघटक योगेश म्हस्के, युवासेना प्रमुख विस्तारक योगेश बेलदार, जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, महानगरप्रमुख दिगंबर नाडे, उपजिल्हाप्रमुख अमोल सूर्यवंशी, प्रमोद लासुरे, विद्यार्थीसेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ.

विद्यार्थीसेना महानगरप्रमुख शुभम पाटील, रोशन शिंदे, आनंद फडतले, महिला आघाडी महानगरप्रमुख अस्मिता देशमाने, पश्चिम विधानसभा समन्वयक सुलोचना मोहिते, ज्योती फड, मंदाकिनी जाधव, रांजना साईखेडेकर, आरती गायके, अमित मांडवे, आकाश पवार, आतिश काळे, अमोल जाधव, राजेंद्र मोहिते, धवल डरंगे, अजय पंडित, यांच्यासह प्रभाग क्र.२४ मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या